संगणक टायपिंग परीक्षा ९ डिसेंबरपासून होणार सुरू
पिंपरी, ता. १९ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी संगणक टायपिंग परीक्षा (ता.९) डिसेंबरपासून सुरू होणार आहे. वेळापत्रकानुसार ९ ते २४ डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. राज्यभरातून एक लाख ३५ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
गेल्या काही वर्षांत मॅन्युअल टायपिंग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर, संगणक टायपिंग परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. परिषदेकडून संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंग आणि शार्टहँड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली. दुसऱ्या सत्रातील ही परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेकडून अनेक बदलही करण्यात आले आहेत. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये परिषदेकडून खबरदारी घेतली जाईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले.
अडचणींचा आढावा
संगणक टायपिंग, शॉर्टहँड परीक्षेत जूनमध्ये पहिल्याच दिवशीपासून तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता. परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेल्या अनेक केंद्रावर संगणक यंत्रणा सक्षम नसल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या होत्या, अशा विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या.
‘‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक टायपिंग परीक्षा नऊ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संगणक टायपिंग परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत लेखी पत्रक काढण्यात आले आहे.’’
- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

