बालेवाडी स्टेडियममधील सुरक्षेचा पोलिस आयुक्त चोबे यांच्याकडून आढावा
पिंपरी, ता.१९ ः विधानसभा निवडणूक भयमुक्त, पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पडावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस दल सज्ज झाले असून चोख नियोजन करण्यात आले आहे. मतदान झाल्यानंतर पिंपरी आणि भोसरी मतदार संघांतील मतदान यंत्रे म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (बालेवाडी स्टेडियम) येथे ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे, येथील सुरक्षेचा आढावा मंगळवारी (ता.१९) पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, परिमंडळ तीनचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते उपस्थित होते. यासह पोलिस आयुक्तांनी इतर ठिकाणच्या सुरक्षेचाही अधिकाऱ्यांकडून आढावा घेत योग्य त्या सूचना दिल्या.
बंदोबस्तासाठी एक पोलिस सहआयुक्त, एक अपर आयुक्त, सहा उपायुक्त, नऊ सहाय्यक आयुक्त, २२१ निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, ३ हजार ९५ अंमलदार, १ हजार होमगार्ड, सीमा सुरक्षा दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रत्येकी २ कंपन्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, हरियाणा पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

