कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोबाईल बंदी पीएमआरडीए प्रशासनाच्या सूचना
पिंपरी, ता. १९ : पीएमआरडीए अंतर्गत गोपनीय माहिती, महत्वाची कागदपत्रे मोबाईलच्या माध्यमातून बाहेर पाठवली जाऊ नये, यासाठी पीएमआरडीएकडून खबरदारी घेतली जात आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. त्याची हळूहळू अंमलबजावणी केली जात आहे. एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे मोबाईल आढळून आल्यास तो जप्त करण्यात येणार असल्याचे प्रत्येक विभागाला कळविण्यात आले आहे.
पीएमआरडीए प्रशासनामार्फत साधारणतः महिन्याभरापूर्वी नव्या कंपनीला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठेका दिलेला आहे. तो देण्यापूर्वी नियम व अटींमध्ये मोबाईल वापरण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी आता केली जात आहे. मोबाईलचा गैरवापर होऊ शकतो. अनेक कर्मचारी मोबाईलमध्ये वेळ घालवतात. आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यामार्फत प्रत्येक विभागाला आपला वैयक्तिक मोबाईल कामाच्या वेळेत वापरता येत नसल्याचे कळविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

