मतदान केंद्रांवर पर्यावरण संदेश...

मतदान केंद्रांवर पर्यावरण संदेश...

Published on

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी पाच प्रमाणे एकूण १५ मतदान केंद्रांवर ‘हरित मतदान केंद्र’ संकल्पना राबविली आहे. यामध्ये विविध पाम प्रजाती, शोभिवंत झाडे, फळझाडे, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरवून माहिती दिली आहे. हरित मतदान केंद्रांमध्ये निगडी ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, सेंट उर्सुला हायस्कूल, संभाजीनगर कमलनयन बजाज हायस्कूल, दापोडी गणेश इंग्लिश स्कूल, हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर, सांगवीतील बाबुरावजी घोलप विद्यालय, रावेतमधील सिटी प्राइड स्कूल, पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूल, जी. के. गुरुकुल, महापालिकेची पिंपळे गुरव शाळा क्रमांक ५४/१, इंद्रायणीनगर येथील स्टर्लिंग स्कूल, स्वामी समर्थ स्कूल, शाहूनगर डी. वाय. पाटील स्कूल, चऱ्होलीतील पंडित नेहरू शाळा आणि दिघीतील रामचंद्र गायकवाड शाळा या मतदान केंद्रांचा समावेश आहे. हे मतदान केंद्र मंगळवारीच सजविण्यात आली असून, त्यांची ही चित्रमय झलक....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com