व्हेरॉक-वेंगसरकर ‘अ’ संघाला जेतेपद

व्हेरॉक-वेंगसरकर ‘अ’ संघाला जेतेपद

Published on

पिंपरी, ता.१९ ः पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीतर्फे, थेरगाव येथे आयोजित १२ वर्षांखालील उन्हाळी ‘व्हेरॉक करंडक’ क्रिकेट स्पर्धेत यजमान व्हेरॉक-वेंगसरकर ‘अ’ संघाने जेतेपद पटकाविले. अष्टपैलू खेळाडू स्वराज सातपुते याला सामनावीराचा किताब मिळाला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी रणजीपटू श्रीकांत कल्याणी यांच्या हस्ते आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, प्रशिक्षक मोहन जाधव, प्रमोद लिमण, शादाब शेख, भूषण सूर्यवंशी, चंदन गंगावणे, राहुल वेंगसरकर आणि डॉ. विजय पाटील हे उपस्थित होते. डॉ. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हेरॉक-वेंगसरकर ‘अ’ संघाने ट्रिनिटी संघावर ११७ धावांनी मात करत विजेतेपद मिळविले. श्रेयान पारवे याने सुरेख अर्धशतक झळकाविले. तर स्वराज सातपुते याने ३ बळी टिपले.
स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून आराध्या पवार, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून स्वराज सातपुते (दोघेही व्हेरॉक वेंगसरकर) तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आयुष पवार (ट्रिनिटी) यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक ः
व्हेरॉक-वेंगसरकर ‘अ’ ः ४० षटकांत ६ बाद २०४ - श्रेयान पारवे ६२, अर्जुन शेट्ये ३८, सिद्धांत लाडे २८ (बी.कृष्णा १/३४, दर्श मंगल १/२४, आयुष तोबरे १/४१, सुजल राणे १/३२) वि.वि. ट्रिनिटी ः ४० षटकांत ९ बाद ८७ - आयुष पवार ३० (स्वराज सातपुते ३/१८, सुधाकर राठोड २/८, सात्विक बोंबले १/११,युनूस खान १/१५, दर्श चानपूर १/९, सिद्धांत लाडे १/०)

मोठ्या धावसंख्या उभारण्यासाठी तंत्रकौशल्य विकसित करताना क्षेत्ररक्षणाला देखील तितकेच महत्व दिले पाहिजे. त्यादृष्टीने तंदुरुस्ती वाढविण्यासाठी परिपूर्ण व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे देखील अत्यंत गरजेचे आहे.
- दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार, भारतीय क्रिकेट संघ
PNE24U64093

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com