

पुणे, ता. २४ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मल्लखांब स्पर्धेत ताथवडे येथील ब्लॉसम पब्लिकचा अर्णव नवले आणि न्यू इंग्लिश स्कूल रमणबागचा संपन्न शिंदे यांनी प्रत्येकी दोन क्रीडा प्रकारांत सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट पटकाविला.
महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. अर्णवने १० ते १२ वर्षे वयोगटात तर संपन्न याने १२ ते १४ वर्षे वयोगटात पुरलेला मल्लखांब, दोरीचा मल्लखांब या क्रीडा प्रकारांत सुवर्णपदके जिंकली.
निकाल
पुरलेला मल्लखांब : १० ते १२ वर्षे : अर्णव नवले (ब्लॉसम पब्लिक, ताथवडे, ८.०७५), आर्यन कोरे (पैसा फंड प्रायमरी, तळेगाव दाभाडे, ८.०२५), अवधूत भंडारी (सरदार दस्तूर, कॅम्प, ७.६७५). १२ ते १४ वर्षे : संपन्न शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, ८.००), तन्मय मुजुमले (न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, ७.९५), अर्णव गुरव (अमृता विद्यालय, निगडी, ७.९०). १४ ते १६ वर्षे : अंशुमन धावडे (आराइज इंटरनॅशनल, भोसरी, ८.५५), सार्थक पवार (डीईएस सेकंडरी, टिळक रस्ता, ८.४५), ओम लाखाशे (मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रस्ता, ८.४०). दोरीवरचा मल्लखांब : १० ते १२ वर्षे : अर्णव नवले (ब्लॉसम पब्लिक, ताथवडे, ८.२०), राजवीर परदेशी (महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रस्ता, ७.६५), आर्यन कोरे (पैसा फंड प्रायमरी, तळेगाव दाभाडे, ७.५०). १२ ते १४ वर्षे : संपन्न शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, ८.००), तन्मय मुजुमले (न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, ७.९०), संग्राम पारंडे (रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय, दिघी, ७.८५).
१४ ते १६ वर्षे : रेवणसिद्ध कोरे (सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे, ८.४५), ओम लाखाशे (गोळवलकर गुरुजी विद्यालय, टिळक रस्ता, ८.४५), अंशुमन धावडे (आराइज इंटरनॅशनल, भोसरी, ८.३५).
PNE24U65596
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.