

सोमाटणे, ता. २९ ः कोकणात थंडी वाढल्याने मेंढपाळांचा घाटमाथ्यावरील मुक्काम काही दिवसांनी वाढला आहे. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला घाटमाथ्यावरील सर्व मेंढपाळ मजल दरमजल करीत खंडाळा, ताम्हिणी, वरंधा
घाटमार्गे कोकणात दाखल होतात.
सात ते आठ महिने मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी कोकणातील विविध ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर पावसाच्या आगमनानुसार जून, जुलै महिन्यांत परतीच्या प्रवासाला निघतात. यावर्षीही घाटमाथ्यावरील सर्व मेंढपाळ नेहमीप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कोकणाच्या वाटेला निघाले होते. परंतु, गेल्या दोन आठवड्यापासून घाटमाथ्यावरील थंडीपेक्षा कोकणात अधिक प्रमाणात थंडी वाढली आहे. थंडीमुळे मेंढ्यांच्या उत्पादनावर, आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी मेंढपाळांनी आपला मुक्काम घाटमाथ्यावर वाढवला असून, थंडी कमी झाल्यानंतर ते पुढील प्रवासाला जाणार आहेत.
थंडीमुळे मेंढ्यांना आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आमचा घाटमाथ्यावर मुक्काम वाढला असून, थंडी कमी झाल्याने आम्ही पुढील प्रवास सुरू करणार आहोत.
गणेश मासाळ, मेंढपाळ, नगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.