वसा समाजसेवेचा, विकास प्रभागाचा

वसा समाजसेवेचा, विकास प्रभागाचा
Published on

इंट्रो - लोकनेते, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ‘नाते जिव्हाळ्याचे कार्य समृद्धीचे’ हा विचार प्रत्यक्षात उतरवत स्नेहा कलाटे आणि त्यांच्या स्नेहा कलाटे सोशल फाउंडेशनची वाकड परिसरात सामाजिक कार्यात दमदार वाटचाल सुरू आहे. नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप व सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी प्रभागाच्या ‘हायटेक’ विकासाचे ‘व्हिजन’ डोळ्यांसमोर आहे. सद्यःस्थितीत असलेला विकास व राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी पुढील पन्नास वर्षांसाठी नेत्रदीपक प्रगतीचा चढता आलेख ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला ‘बेस्ट सिटी’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी विकसित उपनगरांच्या विकासात्मक बदलाचा खारीचा वाटा आहे. त्यापैकीच एक वाकड- पिंपळे निलख. गाव ते उपनगर अशा दोन दशकांच्या विकास प्रवासात या परिसराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. ‘नाते जिव्हाळ्याचे कार्य समृद्धीचे’ हे ब्रीद घेऊन स्नेहा कलाटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वाकड-पिंपळे निलख परिसरात समाजाभिमुख विकास पर्वाची सुरुवात झाली. लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विचार कार्याचा वारसा जपत व नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांच्या कार्यक्षम, कणखर नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली विकास पर्वाची यशोगाथा स्नेहा रणजित कलाटे पुढे नेत आहेत.

चिंचवडच्या विकास पर्वाची सुरुवात
विधानसभा निवडणुका अलीकडेच पार पडल्या. त्यात समस्त चिंचवडकरांनी लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विचारांना व नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांच्या कार्यक्षम नेतृत्वाला ऐतिहासिक विजयश्री मिळवून दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या विचार कार्यास पुढे नेण्यासाठी व चिंचवडच्या विकास पर्वाची त्यांनी सुरुवात केली आहे. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड परिसरात सामाजिक कार्य व विकास कामांना चालना देण्याचे सामाजिक दायित्व स्नेहा रणजित कलाटे यांनी स्वीकारले आहे.

सातत्यपूर्ण समाजाभिमुख कार्य
लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक मुलभूत सेवा-सुविधा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी स्नेहा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य सुरू आहे. विकासात्मक बदल करताना पुढील पन्नास वर्षे दूरदृष्टी ठेवून स्नेहा कलाटे यांना वाकड- पिंपळे निलख परिसराचा विकास साकारायचा आहे. त्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांसह आरोग्य, पाणी, वीज, रस्ते, कोंडी मुक्त प्रदुषणमुक्त परिसर, सेवा-सुविधा, महिला सुरक्षा, असा सर्वांगीण विकास त्यांना साकारायचा आहे.

जनसेवा हीच ईश्वरसेवा
जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून स्नेहा कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून स्नेहा कलाटे यांनी या परिसराच्या विकास पर्वाला पुढे नेण्याचे काम करत आहेत. नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात पुढील पन्नास वर्षे डोळ्यांसमोर ठेवून विकास कामे करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

समाजकारणाचे बाळकडू
अभियांत्रिकी शाखेची पदविका स्नेहा कलाटे यांनी घेतली आहे. स्नेहा यांचे वडील कालिदास वाडेकर व आई शीला कालिदास वाडेकर हे दोघेही चाकण (पुणे) औद्योगिकनगरीतील राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्व. दोघेही सक्रिय राजकारणी-समाजसेवक. दोघांनीही चाकणनगरीचे सरपंचपद भूषविल्याने स्नेहा कलाटे यांना लहानपणापासून घरातूनच समाज कार्याचे बाळकडू मिळालेले आहे. त्यांची समाजाबाबतची धडपड, आत्मीयता, रंजल्या-गांजलेल्या
दीनदुबळ्यांबाबत असलेला जिव्हाळा त्यांनी अनुभवला आहे.

समाजसेवेचे धडे
ज्या समाजात आपण राहतो, वाढतो अन् जीवन जगायला शिकतो. त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. समाजाचे ऋण कायम आपल्यावर असते, ही आग्रही विचारधारा असलेल्या स्नेहा कलाटे
लहानपणीच समाजसेवेकडे ओढल्या गेल्या. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरही समाजसेवेचे धडे त्यांनी गिरवले. त्यामुळे, पुढे जाऊन समाजसेवेतच आपण स्वतःला वाहून घ्यायचे, असा निश्चय लग्नापूर्वीच त्यांनी केला होता.

अध्यक्षपदाची सूत्रे
२०११ मध्ये वाकडचे रणजित कलाटे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर सासरकडील मंडळी देखील सामाजिक बांधिलकी जपणारी मिळाली. मोठे दीर संतोष कलाटे, पती रणजित कलाटे हे बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करण्याबरोबर सक्रिय समाजसेवेत असल्याने आम्हा तिघांच्या एकमतातून व संकल्पनेतून २०१२ मध्ये रणजित आबा कलाटे सोशल फाउंडेशनची स्थापना झाली. अध्यक्षपदाची जबाबदारी आपसूकच स्नेहा कलाटे यांच्यावर सोपविण्यात आली. मग, सुरू झाला समाजहिताच्या उपक्रमांचा झंझावात.

समाजाभिमुख असंख्य उपक्रम
स्वकमाईतील उत्पन्नापैकी वीस टक्के भाग समाजासाठी खर्च करायचा, असे पती आणि दीर यांनी संकल्प सोडला आहे. त्यानुसार, त्याअंतर्गत आजतागायत असंख्य समाजाभिमुख उपक्रमांचा धडका लावला आहे. संतोष कलाटे त्यांना नेहमी सांगतात, आपल्या सत्कर्माची नोंद कुठे तरी होत असते. त्यामुळे, आपण कसलीही अपेक्षा न ठेवता नि:स्वार्थी समाजसेवा केली पाहिजे. आपल्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती रिकाम्या हाताने परतला नाही पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहणे. यातच आपला आनंद असला पाहिजे. या शिकवणीनुसार अविरत समाजसेवा सुरू आहे.

हाकेला धावून जाण्याची तत्परता
फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारी कर्तव्य तत्परता स्नेहा कलाटे यांनी जपली आहे. संकटकाळात फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. यात वाकड, पिंपळे निलख परिसरात १० हजार छत्र्यांचे वाटप केले. कोकण पूरग्रस्तांना ५१ हजार रुपयांची मदत केली आहे. कोरोनाच्या संकट काळात समाजातील सर्व घटकांना आधार देत धूर फवारणी, कीटक नाशक, औषध फवारणी, गो-शाळेला चारा अन अनाथाश्रमाला अन्नधान्याची मदत त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून केली. पाच हजार गरजू कुटुंबीयांना सर्वसमावेशक दिवाळी कीटचे वाटप करण्यात आले. महिलांसाठी एकवीरा देवी व अन्य धार्मिक स्थळांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले.

बॅडमिंटन प्रीमियर लीग
विद्यार्थी घडला; तर देश घडेल. समाज व कुटुंबाचे राहणीमान उंचावेल. त्यामधूनच नव्या भारताची आदर्शवत मुहूर्तमेढ रोवली जाईल. हा आदर्श विचार डोळ्यांसमोर ठेवून. ११ ते ३० वयोगटांतील खेळाडूंसाठी वाकड-पिंपळे निलख बॅडमिंटन प्रीमियर लीगचे आयोजन केले.


पारंपरिक सण-उत्सव उत्साहात
गौरी गणपती सजावट स्पर्धा फाउंडेशनद्वारे घेण्यात आल्या. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशिन, ओव्हन, गॅस शेगडी या पाच मुख्य बक्षिसांसह उत्तेजनार्थ पाच महिलांना पैठणी सोन्याची नथ; तर प्रोत्साहनपर ११ फूड प्रोसेसर, ११ मिक्सर प्रदान करण्यात आले. कोजागरी व दिवाळीनिमित्त ज्येष्ठांसाठी फराळ व विरंगुळा म्हणून कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

नागरिकांना सुविधांचा सेतू
प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आधारकार्ड नोंदणी व वाटप शिबिर. लसीकरणाचे युनिव्हर्सल पास, वीस हजार कालनिर्णय दिनदर्शिकांचे वाटप. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पांडू’ व ‘८३’ चित्रपट दाखविण्यात आले. ‘आयर्न मॅन’ प्रसाद पाटील यांचे कौतुक करीत त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. सनी इस्टेट सोसायटीतील फायर सिस्टम कार्यान्वित केली. ऑस्टिन प्लाझा सोसायटीत गणपती मंदिराला पत्र्याचे शेड बसविले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकारातून वेदांता सोसायटीची पाणी समस्या गंभीर असल्याने बोअरवेल खोदून देत समस्या सोडविली. अतुल एक्सलेन्सी सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. सॅनिटायझर वाटप व औषध फवारणी केली. पोलिसांना भौतिक सुविधा पुरविण्यावर भर दिला. मोफत नेत्र तपासणी व तीन हजार नागरिकांना मोफत चष्मे वाटप केले. ६० नागरिकांची विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

(शब्दांकन: रमेश मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com