

पिंपरी, ता. २९ : ‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक सदनिकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पावणे दोन हजार जणांनी अनामत रक्कम भरली आहे. तर पाच हजार जणांनी अर्जाची नोंदणी केली. शनिवारी (ता. ३०) पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. त्यात प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्या वतीने करण्यात आले.
सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुकांना सदनिकेच्या लॉटरीसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर १ जानेवारीला सोडतीसाठी अर्जाची स्वीकृत प्रारूप यादी प्रसिद्ध करत त्यावर २ डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येईल. १३ जानेवारीला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करत २१ जानेवारीला ड्राय रननंतर २२ जानेवारीला अंतिम सोडत काढण्यात येईल. त्यानंतर ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी आणि प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (वन-बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका आणि एलआयजी (टु-बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (वन-आरके) प्रवर्गात ३४७ तसेच, एलआयजी (वन-बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण एक हजार ३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरी काढण्यात आल्या आहेत.
गुरुवारी (ता. २८) दुपारी तीन वाजेपर्यंत चार हजार ८६१ नागरिकांनी संकेतस्थळावर आपली प्राथमिक नोंदणी केली. एक हजार ७१७ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. सदनिकांसाठी नागरिकांनी https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत.
डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.