

पुणे-नाशिक महामार्गाच्या
वाहतूककोंडीवर उपाययोजना करावी
पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. परिसरात अतिक्रमण कारवाई नंतरही काही बदल झालेला दिसून येत नाही. शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन स्थानिक नागरिकांची, तसेच, पुणे ते चाकण एमआयडीसी तसेच नाशिकला जाणाऱ्या नागरिकांची समस्येवर उपाययोजना करावी, गेल्या दोन- तीन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे, तरी लवकरात लवकर रोड वायडिंग करून मोशीकरांचा गंभीर प्रश्न सोडवावा.
- देवेंद्र पाटील, मोशी
तळेगाव स्टेशन मुख्य वळणावर
चेंबरची दुरवस्था
तळेगाव स्टेशन चौकात मुख्य वळणावर ड्रेनेजचे चेंबरची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पीएमपीएलच्या बसेस, रिक्षा आणि इतर वाहने वळण घेऊन गाव दिशेला जातात. अनेक महिन्यांपासून हे चेंबर उघडे असून त्यामध्ये अनेक पादचारी आणि दुचाकीचे अपघात झाले आहेत. संबंधित विभागाने ताबडतोब चेंबर बसवून दुरुस्ती करावी.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
थेरगावातील बेवारस कार पार्कींगमुळे अडथळा
थेरगावात दत्तनगर राघवेंद्र मठापासून ते पवारनगरपर्यंत पदपथाला लागून असलेल्या बेवारस कार पार्कींगमुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्ता अरुंद झाला आहे, पालिकेने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- रमेश पाटील, थेरगाव
बस थांब्याचे छत मोडकळीला
टी, सी, कॉलनी, विकासनगर, किवळे येथील पीएमपी बस थांब्याचे निवारा छत तुटलेले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता टाळता येत नाही. पीएमपीच्या प्रशासनाने त्वरित योग्य ती उपाययोजना करावी.
- रवींद्र कदम, गुणवंत कामगार, किवळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.