मोशीतील घनकचरा व्यवस्थापन केंद्राला विभागीय आयुक्तांची भेट

मोशीतील घनकचरा व्यवस्थापन
 केंद्राला विभागीय आयुक्तांची भेट
Published on

पिंपरी, ता. २९ ः महापालिकेने विकसित केलेल्या मोशी येथील एकत्रित घनकचरा व्यवस्थापन केंद्राला पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि सह आयुक्त पुनम मेहता यांनी राडारोडा व्यवस्थापन केंद्र, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, प्लॅस्टिक टु फ्युएल तसेच, हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प यांना भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली.
यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बंसल, उप अभियंता योगेश आल्हाट उपस्थित होते. महापालिका कार्यक्षेत्रात निर्माण होणारा घनकचरा विल्हेवाटीबाबत महापालिकेने एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. व्यवस्थापन प्रणाली उल्लेखनीयरित्या कार्यान्वित असल्याने राज्यातील तसेच, देशातील विविध क्षेत्रातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कौतुक होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर सीएनजी गॅस आणि सुक्या कचऱ्यावर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केल्यानंतर वीज निर्मिती होत आहे. तसेच, राडारोडा व्यवस्थापन केंद्र आणि प्लॅस्टिक टू इंधन या प्रकल्पामध्ये बांधकाम साहित्य आणि इंधन निर्मिती होत असल्याने प्रकल्पामध्ये वेस्ट टू वेल्थ संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात महापालिकेस यश आल्याबाबत विभागीय आयुक्त यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com