स्कूलिंपिक्स क्रिकेट (मुले)

स्कूलिंपिक्स क्रिकेट (मुले)
Published on

पुणे, ता.३ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आदित्य मोटे याच्या अर्धशतकाच्या जोरावर उरुळी कांचन येथील सायरस पूनावाला संघाने येरवड्याच्या विबग्योर संघावर ६९ धावांनी विजय मिळविला. याखेरीज, बाल शिक्षण मंदिर, दस्तूर, ब्ल्यू रीज पब्लिक संघांनीही आगेकूच चालू ठेवली.
बिबवेवाडी येथील टेंबेकर फार्म्सच्या मैदानावर हे सामने सुरू आहेत. बाल शिक्षण मंदिर संघाने द न्यू मिलियन इंग्लिश मीडियम संघाला दहा विकेट राखून पराभूत केले. तर कॅम्पमधील सरदार दस्तूर स्कूल संघाने मगरपट्टा येथील विबग्योर संघावर आकर्षक विजय मिळविला. हिंजवडीच्या ब्ल्यू रिज पब्लिक संघाने सूर्यदत्त नॅशनल संघावर दहा विकेट राखून विजय मिळविला.

निकाल :
द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम : ८ षटकांत ५ बाद ६० (धार्मिक राठोड १५, श्लोक सांगेकर १३, अवांतर १३, चिरंतर अराडे १/१९, प्रतीक केळकर १/६, सिद्धार्थ देशपांडे १/१३, अनय वाघ १/१५, आरुष चौधरी १/४) १० विकेट राखून पराभूत विरुद्ध बाल शिक्षण मंदिर : ५.१ षटकांत बिनबाद ६० (चिरंतर अराडे नाबाद ३९, प्रतिक केळकर नाबाद १०, अवांतर १२) सामनावीर : चिरंतर अराडे.
दस्तूर, कॅम्प : ८ षटकांत २ बाद ६७ (प्रथमेश तांबे ४१, पारस डोबल नाबाद १२, अवांतर ६, रौनक तोलानवी (२/११) ४ धावांनी विजयी विरुद्ध विबग्योर, मगरपट्टा ः ७.३ षटकांत सर्व बाद ६३ (अभ्युदय दहिभाते १९, रौनक तोलनवी १९, अवांतर १७, अहाद शेख २/२१, प्रथमेश तांबे १/१, निखिल जाधव २/२१, प्रथमेश अलकोंडा १/१०) सामनावीर : प्रथमेश तांबे.
सायरस पूनावाला, उरुळी कांचन : ८ षटकांत १ बाद ११८ (आदित्य मोटे ५१, ओम कांचन नाबाद ३८, शिवम अदानी नाबाद १०, अवांतर १९, अक्षय वैद्य १/१५) ६९ धावांनी विजयी विरुद्ध विबग्योर, येरवडा : ८ षटकांत ५ बाद ४९ (जयादित्य रमय्या नाबाद ११, अवांतर १०, ओम कांचन १/१३, अर्णव चौधरी १/६, कार्तिक कुंजीर १/२, कार्तिक कांचन १/२) सामनावीर : ओम कांचन.
सूर्यदत्त नॅशनल : ८ षटकांत ७ बाद ३४ (वेदेश नेरकंटी १३, अवांतर ७, रुद्र पाटील १/४, आयुष तंझाडे १/१०, विराज महाशब्दे १/६, आरव नायर १/४) १० विकेट राखून पराभूत विरुद्ध ब्ल्यू रिज पब्लिक, हिंजवडी : ३ षटकांत बिनबाद ३५ (आरव अग्रवाल नाबाद १२, आर्यन गुजर नाबाद ९, अवांतर १४) सामनावीर : आरव नायर.

PNE24U67625, PNE24U67624, PNE24U67623, PNE24U67622

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com