

पुणे, ता.३ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात भिलारेवाडी येथील आर्यन्स वर्ल्ड संघाने सलग दोन विजय मिळवत आगेकूच केली. विस्डम वर्ल्ड, सेंट व्हिन्सेंट, विबग्योर, जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक संघांनी देखील विजयी वाटचाल कायम ठेवली.
डेक्कन जिमखाना मैदानाच्या बास्केटबॉल कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. अटीतटीच्या सामन्यात भिलारेवाडी येथील आर्यन्स वर्ल्ड संघाने शिवणेच्या वॉलनट संघाचा ३० - २५ असा पराभव केला. आर्यन्स वर्ल्डकडून पृथ्वीराज पाटील, दर्श लोमटे यांनी आक्रमक खेळ करत विजयात महत्वाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून अश्विन भालेराव, सोहम नलावडे यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात आर्यन्स वर्ल्ड संघाने कोंढव्याच्या पीजीकेएम संघावर १४ - ३ अशी सहज मात केली. विजयी संघाकडून पृथ्वीराज पाटील, दर्श लोमटे यांनी पुन्हा एकदा सुरेख खेळ केला.
वाकडच्या विस्डम वर्ल्ड संघाने सलग तीन विजय मिळवत विजयी वाटचाल कायम राखली. पहिल्या सामन्यात या संघाने बंडगार्डनच्या जे.एन.पेटिट संघाचा ४३ - ५ असा धुव्वा उडवला. दुसऱ्या सामन्यात त्यांच्याच हडपसर शाखेच्या संघाला ३६ - १२ असे पराभूत केले. हडपसरच्या विस्डम वर्ल्ड संघाने वारजे येथील आर्यन्स वर्ल्ड संघावर ३० - ९ अशी मात केली.
कॅम्पमधील सेंट व्हिन्सेंट संघाने द लेक्सिकॉन संघाचा ५४ - २० असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात त्यांनी हिंजवडीच्या ब्लिस इंटरनॅशनल संघावर ३४ - ७ अशी सहज मात केली. मगरपट्टा येथील विबग्योर संघाने देखील दोन सामन्यांत विजय मिळवला. याशिवाय, पिंपळे सौदागरच्या विबग्योर रोल्स ॲण्ड राईज संघावर ३८ - २५ आणि अभिनव विद्यालय संघावर ३७ - ३३ अशी मात केली.
निकाल
द लेक्सिकॉन इंटरनॅशनल, कल्याणीनगर २६ वि.वि. हेलिओज इंटरनॅशनल, वडगाव शेरी ११. ब्लिस इंटरनॅशनल, हिंजवडी १९ वि.वि. हेलिओज इंटरनॅशनल, वडगाव शेरी १७. मिलेनियम, कर्वेनगर ३० वि.वि. विबग्योर, रूट्स ॲण्ड राईज, पिंपळे सौदागर १३. जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक, नऱ्हे १२ वि.वि. पीजीकेएम, कोंढवा ७. जे.एन. पेटिट टेक्निकल, बंडगार्डन २२ वि.वि. आर्यन्स वर्ल्ड, वारजे १०. जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक, नऱ्हे २३ वि.वि. वॉलनट, शिवणे ८. अभिनव, एरंडवणे ३१ वि.वि. मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर १०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.