सिंहगड सिटीचा आर्यन्स वर्ल्डवर निसटता विजय
पुणे, ता.७ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेत मुलांच्या गटात सिंहगड सिटी संघाने आर्यन्स वर्ल्ड संघावर केवळ दोन धावांनी निसटता विजय मिळविला. अन्य सामन्यांमध्ये सिंहगड स्प्रिंग डेल, नूतन मराठी विद्यालय, विबग्योर यांनी विजयी वाटचाल कायम ठेवली.
धायरी येथील कोद्रे फार्म्सच्या मैदानावर हे सामने सुरू आहेत. सिंहगड स्प्रिंग डेल संघाने पुणे केंब्रिज पब्लिक संघाचा २२ धावांनी पराभव केला. तर नूतन मराठी विद्यालय संघाने ट्री हाऊस संघावर १५ धावांनी विजय मिळविला. विबग्योर संघाने श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संघाचा ७ विकेट राखून पराभव केला.
संक्षिप्त धावफलक
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर : ८ षटकांत १ बाद ७४ (रणवीर सोळंके नाबाद ४४, आर्यन बक्षी २३, अवांतर ६) ७ विकेट राखून पराभूत विरुद्ध विबग्योर हायस्कूल : ७.२ षटकांत ३ बाद ७५ (शिवांश कपूर नाबाद ४०, आरव अग्रवाल १४, अवांतर ८, आर्यन बक्षी १/८, श्लोक चोरडिया १/२५) सामनावीर : शिवांश कपूर.
सिंहगड स्प्रिंगडेल : ८ षटकांत ४ बाद ८८ (अनघ पाडगव्हाणकर २७, युवराज तेलंगे २८, नील नागपाल ११, अवांतर १०, आदित्य शिंदे १/८) २२ धावांनी विजयी विरुद्ध पुणे केंब्रिज पब्लिक : ८ षटकांत ५ बाद ५८ (शिवम पिंपळे १२, आलोक दांदल १८, अवांतर १६, अथर्व पाटील १/१३, रोनित नलावडे १/१७, युवराज तेलंगे १/९) सामनावीर : युवराज तेलंगे
सिंहगड सिटी : ८ षटकांत ४ बाद ६६ (अमेय वीर २५, समर्थराज घुले १३, अवांतर १४, नील देशमुख २/११, शुभम कोरान्ने १/३) २ धावांनी विजयी विरुद्ध आर्यन्स वर्ल्ड : ८ षटकांत २ बाद ६४ (अमेय ऐनापुरे नाबाद ३४, शौर्य जाखळेकर १८, अवांतर ८, समर्थराज घुले १/१३, विघ्नेश केदारी १/१३) सामनावीर : अमेय वीर
नूतन मराठी विद्यालय : ८ षटकांत ३ बाद ६९ (ओम मालुसरे ४६, अनिश भोसले १२, अवांतर ३, सुधन्वा गुदुल १/५) १५ धावांनी विजयी विरुद्ध ट्री हाऊस : ८ षटकांत २ बाद ५४ (देवल देशपांडे नाबाद २५, अवनीश ढमाळ १५, अवांतर ६, अर्जुन सोनार १/११) सामनावीर : ओम मालुसरे
PNE24U69201, PNE24U69203, PNE24U69206, PNE24U69208
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

