इंम्पोर्टेड वाहनांची वाढती ‘क्रेझ’

इंम्पोर्टेड वाहनांची वाढती ‘क्रेझ’

Published on

पिंपरी, ता. ७ : मोठे उद्योग व्‍यवसाय, लाखो रुपयांचे नोकरीचे पॅकेज यामुळे शहरातील नागरिकांच्‍या जीवनमानात देखील कमालीचा बदल झाल्‍याची स्‍थिती आहे. बदलत्‍या जीवनशैलीबरोबरच इंम्पोर्टेड महागडी वाहने वापरण्याची ‘क्रेझ’ देखील शहरवासियांमध्ये दिसत आहे. गेल्‍या वर्षभरात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडे तब्‍बल ३०३ इंम्पोर्टेड वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये दुचाकींपेक्षा चारचाकींचा अधिक समावेश आहे.
विदेशात तयार होणाऱ्या दुचाकी अथवा चारचाकी वाहनांना देशात आयात केले जाते, अशा वाहनांना इंम्पोर्टेड वाहने म्हणतात. दसरा, दिवाळीसारख्या शुभमुहूर्तावर घरोघरी नवनव्या वस्तुंची खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी नवीन वाहने दिसून येतात. दिवाळीच्या सुरूवातीपासून वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत शहरात सात हजार ३४० वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकी ते विविध अवजड प्रवासी व व्यावसायिक वाहनांची नोंद झाली आहे. याद्वारे ४२ कोटींपेक्षा अधिक महसुल आरटीओ विभागाच्या खात्यात जमा झाला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर असल्याने अनेकांचे मोठमोठे व्यवसाय, उद्योगधंदे, तसेच मोठमोठ्या पगारांच्या नोकऱ्यांचे पॅकेज असल्याने शहरात करोडपतींची संख्या देखील मोठी आहे. त्‍यामुळे, आवडी आणि ऐपतीनुसार अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या वाहनांची खरेदी करून आपली हौस पूर्ण करतात.

कोणत्या वाहनांना पसंती
यावर्षी दिवाळीत शहरातील करोडपतींनी रोल्स रॉयस, बेंटले, फरारी, लेम्बोर्गिनी, एमवी अगस्ता, डुकाटी आदी प्रकारच्या करोडो रूपये किंमत असलेल्या इंम्पोर्टेड वाहनांची खरेदी केली आहे. आरटीओकडे या वर्षी ३०३ वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये ३९ दुचाकींचा समावेश आहे. तर २३३ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. याबरोबरच इतर वाहनांमध्ये ट्रॅक्‍टर, क्रेन, फोर्कलिफ्ट आदी ३१ वाहनांची नोंद झाली आहे.

मालकाकडे इंम्पोर्टेड वाहनांचा करभरणा
या वाहनांची खरेदी करताना मालकाला आयात कर भरावा लागतो. यासह सीमा कराची रक्कम भरावी लागत असल्याने इंम्पोर्टेड वाहनांच्या किंमती अधिक वाढतात. हलक्‍या मोटर वाहनाला एकूण किंमतीच्‍या २० टक्‍के कर भरावा लागतो. तर दुचाकीला एकूण किंमतीच्‍या २० टक्‍के कर भरावा लागतो.

खरेदी केलेल्‍या वाहनांची संख्या
दुचाकी - ३९
चारचाकी - २३३
इतर (ट्रॅक्‍टर, क्रेन, फोर्कलिफ्ट) - ३१


इंम्पोर्टेड वाहन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी ३०३ वाहनांची नोंद झालेली आहे. त्यामध्ये दुचाकी व चारचाकीसह इतर वाहनांचा समावेश आहे. या वाहनांना कर देखील वाहनांच्‍या किंमतीनुसार आणि शासनाच्‍या नियमानुसार आकारला जातो.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com