चंपाषष्ठीसाठी भरीताच्या वांग्यांची मोठी आवक खंडेरायाचा नैवेद्य ः मागणी वाढल्याने कांद्याची पातही महागली
पिंपरी, ता.७ ः चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्यांना महत्त्व आहे. शनिवारी साजऱ्या होत असलेल्या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबारायाला वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी आणि कांद्याच्या पातीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. या पार्श्वभूमीवर शहरात भरताचे वांगे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
गेल्या महिन्याच्या तुलनेत अर्धा टनाने भरीताच्या वांग्याची आवक वाढली आहे. मोशी बाजारात दिवसाला दीड टन भरीत वांग्याची आवक होत आहे तर किरकोळ बाजारात या वांग्याचे दर २५ ते ३० रुपये किलो आहेत. शहरातील भाजी बाजारात भाजीपाल्याची हिवाळ्यामुळे आवक वाढू लागली आहे. पावसानंतर भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक होत आहे.
हिवाळ्यात आवर्जून वांग्याच्या भरीताचा आस्वाद घेतला जातो. हुरडा पार्ट्यांमध्येही वांग्याच्या भरीताला मागणी असते. त्यामुळे बाजारात या वांग्याची आवक वाढली आहे. भरीताच्या वांग्यांसह कांद्याच्या पातीची मागणी वाढल्याने वांग्यांसह कांद्याची पातही महागली. ठोक बाजारात कांद्याच्या पातीची जुडी १० रुपयाला विक्री केली जात होती. तर किरकोळ बाजारात कांद्याच्या पातीचे दर साधारणपणे २५ ते ३० रुपये जुडी असे आहेत. सध्या भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ होत आहे. पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
वांग्याची आवक वाढली
आज (ता. ७) शनिवारी चंपाषष्ठी साजरी केली जात आहे. या दिवशी खंडेरायाची तळी भरण्यात येऊन त्यांना वांग्याचे भरीत, भाकरी, कांद्याची पात, असा नैवेद्य दाखवला जातो. यासाठी भरीताच्या वांग्याची खरेदी नागरिकांकडून केली जाते. नोव्हेंबरच्या सुरवातीला दिवसाला एक टन असणारी वांग्याची आवक वाढवून ती आता दीड टनापर्यंत गेली आहे. हिवाळ्यात व चंपाषष्ठीच्या पार्श्वभूमीवर भरीताच्या वांग्याला व कांद्याच्या पातीची मागणी वाढली आहे.
‘‘हिवाळा व चंपाषष्ठीसाठी भरीताचे वांगे आवर्जून खरेदी केले जाते. बाजारात मोठ्या प्रमाणावर वांग्यांची आवक झाली आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने मागणी वाढली असली तरी वांग्याला किंमत कमी मिळत आहे.’’
-आकाश बांगर, भाजी विक्रेता, मोशी बाजार
फोटोः 69312
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

