पोलिसांना वाढदिवशी
मिळणार हक्काची सुटी

पोलिसांना वाढदिवशी मिळणार हक्काची सुटी

Published on

पिंपरी, ता. ७ : नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांना स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यातच वाढदिवसारख्या महत्त्वाच्या दिवशीही पोलिसांना घर आणि कुटुंबाला वेळ देता येत नाही. मात्र, आता पिंपरी - चिंचवड पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाला हक्काची सुटी मिळणार असून, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोलिस ठाण्यात वाढदिवसही साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवशी पोलिसांना सुटी देण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
सततचा बंदोबस्त आणि कामाच्या ताणामुळे पोलिसांना कुटुंबीयांसाठीदेखील वेळ देता येत नाही. अतिताणामुळे पोलिसांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. अनेक वेळेला पोलिसांना आपला वाढदिवसही साजरा करता येत नाही. दरम्यान, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले आहे. आता पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाला सुटी जाहीर केली असून, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छापत्र देण्याबाबतही सूचना दिल्या आहेत.
--------------------
पोलिस आयुक्तांकडून ‘गिफ्ट’
वाढदिवशी आपण कुटुंबासमवेत असावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र, कामाच्या व्यापात ते अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांचाही हिरमोड होतो. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी वाढदिवशी सुटी जाहीर करण्यासह वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोलिस ठाण्यात वाढदिवसही साजरा करण्याबाबतचे ‘गिफ्ट’ दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com