नालंदा, सिंबायोसिसचे लागोपाठ विजय
पुणे, ता.७ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत नालंदा, सिंबायोसिस, एल्प्रो इंटरनॅशनल, विद्या प्रतिष्ठान या संघांनी लागोपाठ दोन सामने जिंकले.
डेक्कन जिमखाना येथे हे सामने सुरू आहेत. मुलींच्या लढतीत धायरी येथील नालंदा इंग्लिश मीडियम संघाने उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूल संघाचा २५ - ८, २५ - ९ असा पराभव केला. विजयी संघाकडून अमृता सोहोनी, प्रिक्षा सस्ते यांनी उल्लेखनीय खेळ केला. त्यापाठोपाठ नालंदा संघाने पाषाणच्या लोकसेवा संघाला २५ - ९, २५ - ४ असे पराभूत करत लागोपाठ दुसरा विजय नोंदविला.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संघाने पाषाणच्या लोकसेवा संघाचा २५ - १२, २५ - १७ असा सहज पराभव केला. विजयी संघाच्या सृष्टी गायकवाड हिने सुरेख खेळ केला. विद्या प्रतिष्ठान संघाने दुसऱ्या सामन्यात उरुळी कांचन येथील एंजल संघावर २५ - ११, २५ - १३ अशी मात करत दुसरा विजय नोंदविला. चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनल संघाने अजिंक्य देडगे पब्लिक संघाला २५ - ९, २५ - १० अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. एल्प्रो इंटरनॅशनल संघाने एसपीएम पब्लिक संघावर २५ - ४, २५ - १२ अशी मात करत लागोपाठ दुसरा विजय मिळविला. अन्य एका सामन्यात प्रभात रस्ता येथील सिंबायोसिस स्कूल संघाने एसपीएम पब्लिक संघावर २५ - ३, २५ - ६ असा दणदणीत विजय नोंदविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

