जिल्ह्यातील ४, ७२८ विद्यार्थ्यांची ‘परख’ पिंपरी चिंचवडमधील २५ शाळांचा समावेश, विविध प्रश्नांद्वारे साधला संवाद
पिंपरी, ता. ७ ः विद्यार्थ्यांची ज्ञान संपादणूक, अध्यापन कौशल्य अशा दोन्ही बाबींची तपासणी नुकतीच करण्यात आली. परफॉमन्स असेसमेंट रिव्ह्यू ॲन्ड ॲनॅलिसिस ऑफ होलीस्टिक डेव्हलपमेंट’ (परख) नावाच्या प्रक्रियेंतर्गत पुणे जिल्ह्यातील १६५ शाळांमधील ४ हजार ७२८ विद्यार्थ्यांची ‘परख’ करण्यात आली. यात पिंपरी चिंचवड शहरातील २५ शाळांचा समावेश होता.
महापालिका, निमशासकीय व खासगी व्यवस्थापनातील मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा चारही माध्यमांच्या पुणे जिल्ह्यातील १६४ शाळांची निवड यासाठी करण्यात आली होती. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळात ही तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी तिसऱ्या, सहाव्या आणि नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यानुसार तिसरीतील १३९२, सहावीतील १३८६ आणि नववीतील १९५० विद्यार्थ्यांशी संबंधित यंत्रणेने संवाद साधला. शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसुद्धा प्रश्नावली स्वरूपात सर्वेक्षण करण्यात आले.
विद्यार्थ्यांशी साधला संवाद
२१५ क्षेत्रीय अन्वेषकांनी ही तपासणी केली. त्यांनी प्रत्येक वर्गातील ३० विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र यासारख्या विषयांमधील ज्ञान तपासून पाहण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) शिक्षकांच्या समितीमार्फत ही तपासणी करण्यात आली.
आकडे बोलतात
‘परख’मधील सहभाग
इयत्ता - शाळा - विद्यार्थी संख्या - शिक्षक संख्या - क्षेत्रीय अन्वेषक
तिसरी - ५० - १ हजार ३९२ -११२ -१००
सहावी - ५१ - १ हजार ३८६ - १३६ -५१
नववी - ६४ - १ हजार ९५० - २५५ -६४
एकूण क्षेत्रीय अन्वेषक - २१५
‘‘शैक्षणिक धोरण २०२० नुसार वयोगट निहाय इयत्ता निवडण्यात आल्या. सद्यःस्थितीत शिक्षणाची परिणामकारकता तपासणे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता किती विकसित झाल्या आहेत. त्या शोधून तपासून पाहणे, त्यांच्या अडचणी जाणून त्यावर उपाययोजना आखणे या हेतूने सर्वेक्षण घेण्यात आले.’’
- राजश्री खंडू तिटकारे,अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

