रिंग रोडचा भूसंपादन तिढा सोडवा ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे यांची सूचना
पिंपरी, ता. ८ : ‘पीएमआरडीए’कडून विकसित करण्यात येत असलेल्या रिंग रोडची भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, त्यासंबंधी सर्व प्रक्रिया सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे यांनी दिल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकारी देखील उपस्थित होते. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘पीएमआरडीए’च्यावतीने साकारण्यात येणाऱ्या रिंगरोड कामाचे टप्पानिहाय नियोजन केले आहे. १२८ किलोमीटर लांबीचा रस्ता सोळू येथून सुरू होतो. या रस्त्याचे ‘पीएमआरडीए’कडून ८३.१२ किलोमीटरचे काम केले जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे या ४.७० किलोमीटर रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामावर दरवेळी चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात त्यावर अंमलबजावणी होत नाही. दरम्यान, याबाबत कार्यवाही करण्यासाठी नुकतीच ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डीतील कार्यालयात आयुक्त योगेश म्हसे यांनी अभियांत्रिकी विभागाची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये रिंग रोड सोबतच इतर प्रकल्पावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
‘‘रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी लवकर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोळू ते वडगाव शिंदे आणि पुणे-अहिल्यानगर रस्ता ते पुणे-सातारा रस्ता या दरम्यान ३२ किलोमीटर अंतरात देखील भूसंपादन प्रक्रिया केली जाणार आहे. याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेले आहे. त्याविषयी बैठकीत चर्चा झाली. अद्याप रिंग रोड संदर्भात जागा ताब्यात नसल्याने त्यावरती कोणतीही कार्यवाही होऊ शकत नाही. तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांनी शेतकऱ्याची बैठक घेऊन त्यांच्या म्हणणे ऐकून घेतले होते. मात्र त्यानंतर प्रत्यक्षामध्ये कोणती कारवाई झाली नाही. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांकडून भूसंपादन प्रक्रिया देखील रखडलेली आहे.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

