पोलिसांसाठी स्वतंत्र दवाखाना
पोलिसांसाठी आता स्वतंत्र दवाखाना
पिंपरी, ता. ११ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी, अंमलदारांसाठी आता वाकड येथील पोलिस लाईनमध्ये स्वतंत्र दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली जात आहे.
शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिस दल कायम तत्पर असते. मात्र, कामाचा ताण, शारीरिक, मानसिक थकवा यामध्ये पोलिसांना स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. अनेकदा पोलिसांना १२ तास ऑन ड्युटी रहावे लागते. परिणामी पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. अशावेळी त्यांना योग्य उपचार मिळणेही आवश्यक आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू होऊन सहा वर्षे उलटल्यानंतर पोलिसांसाठी स्वतंत्र दवाखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाकड येथील पोलिस लाईनमध्ये हा दवाखाना लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी सुरुवातीला किमान दोन ते तीन डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी, जिल्हा रुग्णालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कंत्राटी पद्धतीने वॉर्डबॉय, शिपाई, सफाई कामगार, यांचीही नेमणूक केली जाणार आहे. यामुळे पोलिस अंमलदारांना वैद्यकीय उपचार मिळणे अधिक सोयीचे होणार आहे.
-------------
वाकड पोलिस लाईनमध्ये पोलिसांसाठी स्वतंत्र दवाखाना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांची मागणी केली असून, इतर स्टाफही कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, पोलिस मुख्यालय, पिंपरी-चिंचवड.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

