पिंपरी महापालिका बैठक
नागरी तक्रारींचे निराकरण
वेळेत न केल्यास कारवाई
महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा
पिंपरी, ता. ११ ः ‘‘महापालिकेच्या सारथी पोर्टलसह इतर माध्यमांतून आलेल्या तक्रारींचा निपटारा विहित वेळेत करा. कोणत्याही तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल,’’ असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.
महापालिकेतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीत सारथी पोर्टल, आपले सरकार, पीजी पोर्टल, सीएमओ पोर्टल अशा विविध तक्रार निवारण प्रणालींवर आलेल्या तक्रारींचा व त्यावर संबंधित विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्त सिंह यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अविनाश शिंदे, अण्णा बोदडे, नीलेश भदाने, मनोज लोणकर, संदीप खोत आदी उपस्थित होते.
आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
- सारथी पोर्टल आणि ॲपद्वारे नागरिक तक्रारी नोंदवतात. त्यांचे प्रश्न जलदगतीने सोडवून तक्रारींचा निपटारा तत्काळ करणे आवश्यक आहे
- पायाभूत सुविधांचा व्यवस्थितपणे वापर होतो की नाही, याकडे सातत्याने लक्ष द्यावे, त्यातून नागरी समाधानाचा निर्देशांक वाढण्यासाठी मदत होते
- महापालिकेच्या सुविधांबद्दल नागरिक तक्रारवजा सूचना विविध प्रणालीद्वारे नोंदवितात, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून वेळेत निराकरण करा
- तक्रारींचे निराकरण केल्यानंतर त्याची नोंद संबंधित पोर्टलवर तत्काळ करा, गांभीर्याने तक्रारींचा निपटारा करण्यावर भर द्या
- विभागप्रमुखांच्या पातळीवर वेळोवेळी तक्रारींचा आढावा घेऊन निपटारा करण्यासाठी नियोजन करा
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

