कुमार निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत चिखलीच्या ओम साई संघाला विजेतेपद

कुमार निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत चिखलीच्या ओम साई संघाला विजेतेपद

Published on

चिखली, ता. ११ : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई संघाच्यावतीने चिखलीत आयोजित पिंपरी-चिंचवड विभाग कुमार-कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात यजमान ओम साई कबड्डी संघाने विजेतेपद पटकाविले.
या निवड चाचणीत पिंपरी-चिंचवड विभागातील मुलींच्या २० तर मुलांच्या ४७ अशा एकूण ६७ संघांनी सहभाग नोंदविला. मुलीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प संघाने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक बाबुराव चांदेरे, ओम साई संघाचे मार्गदर्शक व कबड्डीपटू प्रवीण नेवाळे, चिखली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल साळुंखे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, गीताराम मोरे, समीर मासुळकर, संजय नेवाळे, विनायक रणसुभे, सुलभा उबाळे, संगीता ताम्हाणे, साधना मळेकर, विष्णुपंत नेवाळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप नेवाळे, विकास साने, काळुराम यादव, गणपत आहेर, सदाशिव नेवाळे, यश साने आदी मान्यवर उपस्थित होते.
कुमार गटात बोपखेलचा राकेशभाऊ घुले संघाने द्वितीय स्थान मिळविले. वडगाव सहानीचा ओम साई कबड्डी संघ तृतीय तर भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघ चतुर्थ स्थानावर राहिला. कुमारी गटात मनपा क्रीडा कला विकास प्रकल्प (अ), महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, भोसरी (अ), घोडेगावचा अभिनव संघ आणि प्रकाशतात्या बालवडकर स्पोर्टस क्लब हे अनुक्रमे पहिल्या ते चौथ्या क्रमांकावर राहिले.

PNE24U70371

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com