अभिनवची अटीतटीच्या सामन्यात बाजी

अभिनवची अटीतटीच्या सामन्यात बाजी

Published on

पुणे, ता.११ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत हडपसरच्या एंजल मिकी संघाच्या अविष्कार बोबडे याने नाबाद अर्धशतक झळकावूनही अभिनव विद्याच्या फलंदाजांनी सुरेख फलंदाजी करत विजय खेचून आणला. अन्य सामन्यांमध्ये डॉ.अस्मिता विद्यालय, मिलेनियम नॅशनल या संघांनी शानदार विजय मिळवले.
बिबवेवाडी येथील टेंबेकर फार्म्सच्या मैदानावर हे सामने सुरू आहेत‌. पहिल्यांदा फलंदाजी करताना हडपसरच्या एंजल मिकी संघाने शतकी धावसंख्या ओलांडली. त्यात सलामीवीर अविष्कार बोबडे याच्या नाबाद ६८ धावांचा मोलाचा वाटा राहिला. आव्हानाचा पाठलाग करताना अभिनव विद्या स्कूलचा सलामीवीर शौनक राजे लवकर तंबूत परतला. परंतु, वीर कारखानीस, ईशान गुप्ते यांनी सुरेख फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. अन्य सामन्यात मिलेनियम नॅशनल संघाने जयहिंद स्कूल संघाचे सर्व गडी बाद करून एकतर्फी विजय संपादन केला. डॉ.अस्मिता विद्यालयाने वाकडच्या विस्डम स्कूल संघाविरुद्ध २९ धावांनी विजय मिळविला.

संक्षिप्त धावफलक
डॉ. अस्मिता विद्यालय : ८ षटकांत ५ बाद ९३ (प्रतीक कडलक ६१, देवांश मेमाणे १५, अवांतर ३, अथांग शिंदे २/२०,सिद्धांत कुंभार २/१५) २९ धावांनी विजयी विरुद्ध विस्डम स्कूल, वाकड : ८ षटकांत ५ बाद ६४ (वरद भालेराव २६, अर्जुन काचवे ११, अवांतर ६, ओम वाईकर ३/१३, देवांश मेमाणे १/९, भुवनेश भोर १/९) सामनावीर : ओम वाईकर

एंजल मिकी स्कूल, हडपसर : ८ षटकांत ३ बाद १०२ (अविष्कार बोबडे नाबाद ६८, ओम तांबे १९, अवांतर ९, सुकृत उपासनी १/२३, आलाप पंगू १/११, आरोह सोंडकर १/९) ८ विकेट राखून पराभूत विरुद्ध अभिनव विद्या स्कूल : ७.१ षटकांत २ बाद १०८ (वीर कारखानीस ४३, ईशान गुप्ते नाबाद ४३, अवांतर १४, पृथ्वी जाचक १/१३, सत्यजित जगताप १/२९) सामनावीर : ईशान गुप्ते

जयहिंद हायस्कूल : ७.३ षटकांत सर्व बाद ५२ (स्वरूप सूर्यवंशी १८, प्रथमेश भालेराव १८, अवांतर ३, कृष्णा साहू ४/६, हर्षवर्धन मानकर १/९, अरिन सातपुते २/१ आरुष पाटील १/१) ८ विकेट राखून पराभूत विरुद्ध मिलेनियम नॅशनल : ५.३ षटकांत २ बाद ५३ (अंश चरवड नाबाद ३४, अवांतर ६, अधिराज कुर्लेकर २/१२) सामनावीर : कृष्णा साहू
PNE24U70427, PNE24U70430, PNE24U70432

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com