धनेश्वर मंदिराजवळच कचरा, राडारोडा

धनेश्वर मंदिराजवळच कचरा, राडारोडा

Published on

धनेश्वर मंदिराजवळच सीमा भिंत बांधली आहे. नदी पात्राकडे जाताना उतार असल्याने वर्ष झाले कचराच उचलला नसल्याने नदी पात्रात कचरा मिसळतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, रोगराईला निमंत्रण दिले जात आहे. कचरा उचलणे अत्यावश्यक आहे, तरी पालिकेने योग्य ती उपाययोजना करावी.
- रमेश पाटील, चिंचवड

स्वामी विवेकानंद स्मारकाची दुरवस्था
चिंचवडगावात पिंपरी-चिंचवड लिंकरोड येथील देवघर कॉलनीजवळ स्वामी विवेकानंद यांचे स्मारक आहे. परंतु, सध्या या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. स्मारक परिसरात सर्वत्र झाडेझुडपे वाढली असून, तिथे जाणेसुद्धा कठीण झाले आहे. संबंधित विभागाने स्मारक व संपूर्ण परिसर स्वच्छ करावा.
- विवेक मैत्र, चिंचवड

पॉवर हाऊस चौकातील वाचनालयाची दुरवस्था
स्मार्ट सिटीतील पिंपरी गाव पॉवर हाऊस चौक परिसरात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वाचनालयाची दुरवस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या देखील नाहीत. त्वरित खुर्च्या बसवून द्यावे व वाचनालयाची दुरुस्ती करावी.
- सुहास कुदळे, पिंपरीगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com