धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची
पुस्तक ठरले ‘लक्षवेधक’

धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची पुस्तक ठरले ‘लक्षवेधक’

Published on

पिंपरी, ता. १३ ः यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंच यांच्या वतीने पुरस्कारासाठी प्राप्त ७२ शैक्षणिक पुस्तकातून ‘लक्षवेधक’ पुस्तक म्हणून ‘धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची’ हे शिवराज पिंपुडे लिखित ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित पुस्तकाची निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुस्तकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंच यांच्या वतीने देण्यात येणारा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार-२०२४ योगेश कुलकर्णी लिखित ‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. याबरोबरच ‘घाट शिकण्या शिकवण्याचा’ सुचिता पडळकर आणि इंद्रजीत भोसले (प्रकाशक - सृजन आनंद विद्यालय, कोल्हापूर), ‘माझे शाळेतील प्रयोग’- स्मिता गौड (प्रकाशन - राजहंस प्रकाशन) ही तिन्ही पुस्तके शिक्षणप्रेमी वाचकांनी व शिक्षकांनी निश्चितपणे वाचावीत अशी आहेत. या पुस्तकांत मांडण्यात आलेले उपक्रम व लेखकांचे अनुभव शिक्षकांना प्रेरणादायक आणि अनुकरण करण्याचे आहे.
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद संगोराम, शिवाजी तांबे, डॉ. वृषाली देहडराय, महेंद्र गणपुले या अभ्यासकांच्या समितीने या पुरस्कार निवडीचे काम केले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षातील पुरस्कारांसाठी राज्यभरातून ७२ ग्रंथ आले होते. त्या ग्रंथाचे आशय, निर्मितिमूल्य, मांडणी आणि उपयुक्तता या चार निकषांच्या आधारे या समितीने परीक्षण केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com