रेल्‍वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांवरील 
कारवाईची प्रक्रिया थांबवा

रेल्‍वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांवरील कारवाईची प्रक्रिया थांबवा

Published on

पिंपरी, ता. १३ : पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत असणाऱ्या झोपडपट्टीवासियांवर कारवाई करण्यात येणार असल्‍याची रेल्‍वे प्रशासनाकडून नोटिस बजाविण्यात आली आहे. या झोपडपट्टीधारकांच्‍या पुनर्वसनाचा प्रश्‍न रखडलेला आहे. त्‍यावर मार्ग निघेपर्यंत कारवाईची प्रक्रिया थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आनंदनगर परिसरातील प्रमुख कार्यकर्ते एकत्रित येऊन ‘घर हक्क सुरक्षा समिती’ स्थापन करून साईबाबानगर, दळवीनगर, पिंपरी, शिवाजीनगर आदी रेल्वेबाधित झोपडपट्ट्यांतील कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. रेल्‍वे प्रशासनाने कारवाई करू नये, यासाठी मुंबईतील आजाद मैदान येथे आंदोलनात सहभाग घेतला. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडून आनंदनगर येथील रहिवाशांचे पुनर्वसनांचा प्रयत्न करू, असे लेखी पत्र रेल्वे प्रशासनाला देण्यासाठी मिळवले. कारवाई थांबविण्यासाठी खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व संबंधित वरिष्ठ रेल्वे अधिकारी आदींना भेटून ही कारवाई थांबवावी यासाठी प्रयत्‍न केले. मात्र, पुन्‍हा नोटिस पाठविण्यात आल्‍या आहेत. ही कारवाई थांबवून दिलासा द्यावा, अशी मागणी भापकर यांनी रेल्‍वे प्रशासनाकडे केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com