दोन हजार ८६४ जणांची अनामत रक्कम जमा
पिंपरी, ता. १३ : पीएमआरडीएच्या (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) सदनिकांसाठी दोन हजार ८६४ जणांनी अनामत रक्कमेचा भरणा केला आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दोन दिवसांची शिल्लक असून, तेराशे सदनिकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना अर्ज करायचे आहे त्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पीएमआरडीएच्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथे सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेंतर्गत सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अर्ज भरणारे वाढले होते. मात्र, अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्या कमी होती. पहिल्या वेळी दिलेली मुदत संपल्याने पुन्हा १५ डिसेंबर पर्यंत मुदत वाढविण्यात आली. सध्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. आत्तापर्यंत २ हजार ८६४ नागरिकांनी अनामत रक्कम जमा केली आहे. पीएमआरडीएच्या पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ईडब्ल्यूएस (वन बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथे ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गात ३४७ तसेच एलआयजी (वन बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण एक हजार ३३७ शिल्लक असलेल्या सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
यासाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता. १३) दुपारपर्यंत दोन हजार ८६४ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. या सदनिकांसाठी रविवारी (ता. १५) पर्यंतच अर्ज भरता येणार आहे. इच्छुक नागरिकांनी https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

