आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी ईश्वरीची निवड
पिंपरी, ता. १३ ः पिंपरी-चिंचवड क्रिकेट क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निगडी प्राधिकरण येथील ईश्वरी अवसरे हिची भारतीय महिला संघात निवड झाली आहे. मलेशिया येथे ही स्पर्धा होणार आहे.
ईश्वरी हिने २०२४ या एकाच वर्षात १५ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील तसेच थायलंड येथे झालेल्या महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने १९ वर्षांखालील राज्यस्तरीय टी-२० स्पर्धेत
तीन अर्धशतके अणि एक शतक झळकाविले आहे. यष्टिरक्षण, फिरकी गोलंदाजी (लेग स्पीन) तिने केली आहे. सध्या तिने आपले पूर्ण लक्ष फलंदाजीवर केंद्रीत केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून ईश्वरी ही प्राधिकरणातील दिवेकर क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असून तिला अकादमीचे प्रमुख सुनील दिवेकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
भारतीय संघाची पहिली लढत रविवारी (ता.१५) पारंपरिक प्रतिस्पर्धी पकिस्तानच्या संघाबरोबर होणार आहे.
ईश्वरी उत्कृष्ट फलंदाज असून सलामीवीर म्हणून खेळते. काही सामन्यांत तिने मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. राज्याच्या वरिष्ठ संघातून खेळताना तिने नाबाद २७० धावा फटकाविल्या. ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना नेणे हे माझे स्वप्न होते. हे स्वप्न आता पूर्ण होत आहे.
- सुनील दिवेकर, प्रशिक्षक, दिवेकर क्रिकेट अकादमी, प्राधिकरण
त्याला माझे नाव सांग...
पुण्यात २०१८ च्या सुमारास भरविलेल्या गेलेल्या टॅलेंट शिबिराला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, केदार जाधव अशा वरिष्ठ खेळाडूंनी हजेरी लावली होती. त्यावेळेस अवघ्या नऊ वर्षांच्या ईश्वरीची फलंदाजी पाहून पुढे येत सचिनने तिला काही टिप्स दिल्या. तिच्याशी १० मिनिटे एकटा बोलला. फलंदाजीचा ‘स्टांस’ बदलायचा नाही. कोणी तसे सांगितले तर त्याला माझे नाव सांग... अशा शब्दांत सचिन तेंडुलकर याने तिचे कौतुक केले, अशी आठवण दिवेकर यांनी सांगितली.
PNE24U71077, PNE24U71078
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

