वडमुखवाडी येथे वाहतूक कोंडी अवजड वाहनांमुळे खोळंबा, मात्र वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
चऱ्होली, ता. १३ : पुणे-आळंदी मार्गावरील वडमुखवाडी येथे सातत्याने नागरिक व वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
आळंदी-पुणे असा विस्तृत पालखी मार्ग तयार होऊनही नागरिक व वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर आळंदी बायपास रोडने येणारी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. गुरुवारी (ता. १२) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना साधारण अर्धा ते पाऊणतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही वेळाने वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली.
पुणे-आळंदी बीआरटी मार्ग, मुख्य रस्ता तसेच सर्व्हिस रस्ता असून देखील चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था कार्यान्वित नसल्याने व वाहतूक पोलिसांचे कर्मचारी उपस्थित नसल्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे. येथील सिग्नल व्यवस्था सुरळीत करून वाहतूक नियंत्रण कर्मचारी ठेवल्यास येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.
मंगल कार्यालयामुळे समस्या
लग्नसराई सुरू असल्याने व मंगल कार्यालयांची पार्किंग व्यवस्था पुरेशी नसल्याने बहुतांश वऱ्हाडीमंडळी रस्त्यात वाहने लावत आहेत. तसेच लग्न लागताच आपले वाहन काढण्यासाठी वाहनचालक व नागरिकांची गडबड सुरू होते. यावेळी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
‘‘वडमुखवाडीकडे जाणारा रस्ता ९० मीटरचा आहे. परंतु; या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने ही समस्या निर्माण होत आहे. जोपर्यंत रस्ता मोठा होत नाही, तोपर्यंत वडमुखवाडीवरून भोसरीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालावी.
- नितीन काळजे, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड
फोटोः 71162
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

