प्रतिसाद वाढण्यासाठी पीएमआरडीएच्या सदनिकांच्या अनामत रक्कमेत घट

प्रतिसाद वाढण्यासाठी पीएमआरडीएच्या सदनिकांच्या अनामत रक्कमेत घट

‘पीएमआरडीए’च्या सदनिकांच्या अनामत रक्कमेत घट

प्रतिसाद वाढविण्यासाठी बदल; सेक्टर १२, ३०, ३२ गृहप्रकल्पांचा सोडतीला मुहूर्त

पिंपरी, ता. १ : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) गृहप्रकल्पाच्या अनामत रक्‍कम कमी करण्यात आली आहे. सेक्टर १२, ३० आणि ३२ या ठिकाणच्या सदनिकांसाठी त्‍यामुळे मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे. लवकरच येथील सदनिकांसाठी सोडत काढली जाणार आहे. येत्या महिनाभरात त्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पीएमआरडीएने इंद्रायणीनगर, भोसरी आणि वाल्‍हेकरवाडी येथे गृहप्रकल्प उभारला आहे. सेक्टर १२ आणि ३० आणि ३२ या दोन्ही ठिकाणी जवळपास बाराशेहून अधिक सदनिका वाटपाअभावी शिल्‍लक आहेत. यापूर्वी एकदा सोडत काढण्यात आली होती. यामध्ये अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सदनिका शिल्‍लक राहिल्‍या आहेत. अनेकांनी वेळेत पैसे भरून कागदपत्रांची पूर्तता न केली नाही. त्‍यामुळे सदनिकांचा ताबा देता आला नाही. चिंचवड वाल्हेकरवाडी येथील ३० आणि ३२ या ठिकाणी यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये १९२ सदनिकाधारकांची निवड करण्यात आली होती. विलंब शुल्क, मुद्रांक शुल्क यासह अनामत रक्कम भरलेले मात्र, उर्वरित रक्कम न भरलेल्या धारकांना ताबा मिळू शकला नाही. त्यामुळे मोठी संख्या घटली होती. या घरांसाठी दुसरी सोडत काढण्यात येणार आहे. सेक्टर १२ या ठिकाणी गृहप्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात चार हजार ८८३ घरे उभारण्यात आली. त्यापैकी अनेक घरे रिकामी राहिल्याने नव्याने सोडत काढली जाणार आहे. यातून देखील घरे शिल्लक राहिल्यास ती सर्वांसाठी खुली असून, पहिले येतील त्यास घरे देण्यात येणार आहे.
दरम्यान, या घरांना नागरिकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा आणि रिकाम्या घरांची विक्री लवकर व्हावी, यासाठी पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाच्या वतीने काही बदल करण्यात येणार आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी आकारण्यात येणारी अनामत रक्कम कमी केली जाणार आहे. सदनिका सोडत अर्ज भरताना सदनिकेच्या रकमेच्‍या दहा टक्के रक्कम ही भरावी लागत होती. त्यामुळे ती रक्कम जवळपास लाखांच्या घरात जात होती. एवढी रक्कम एकाच वेळी भरणे अर्जदारांना शक्य होत नव्‍हते. परिणाम, सोडतीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी त्याला रकमेमध्ये घट केली जाणार असून, दहा हजार रुपये अनामत रक्‍कम असल्‍याचे सांगण्यात आले.

पीएमआरडीएच्‍या सदनिकांच्‍या वाटपासाठी या महिन्‍यातच लॉटरी काढण्यात येणार आहे. त्‍याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सध्या सदनिकांसाठी लागणारी अनामत रक्‍कम देखील कमी करण्यात येणार आहे. त्‍याची कार्यवाही लवकरच केली जाईल.
- हिंमत खराडे, उपजिल्‍हाधिकारी, पीएमआरडीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com