उद्योजक संघटनेकडून रक्तदान, वृक्षारोपण

उद्योजक संघटनेकडून रक्तदान, वृक्षारोपण

पिंपरी, ता. ३ ः चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दरम्यान, निघोजे परिसरामध्ये वृक्षारोपण केले. जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २५०हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले. याप्रसंगी कामगार नेते यशवंत भोसले उपस्थित होते. त्याचबरोबर अभिजित प्लास्टिकचे अभिजित राऊत, बांधकाम व्यावसायिक नामदेव पोटे, उद्योजक मनोज जरे, श्रीराम हंडीबाग, पोपट साठे उपस्थित होते. संघटनेचे सचिव निवास माने, संचालक दत्तात्रेय दगडे यांनी संघटनेची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com