अवतीभवती

अवतीभवती

Published on

वारकऱ्यांना औषध वाटप
पिंपरी, ता.२ ः आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या शिक्षक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना औषधे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी कॉलेजचे माजी विद्यार्थी रोहित कटारिया, धीरज सुराणा आणि प्रा. पल्लवी चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. कॉलेजचे विद्यार्थी वेदांग जाधव, शार्दुल ढमाले, तुषार रंधवणे, ओंकार शिंदे, भाविका शिर्के, अदिती आंबेकर, तुषार गौड, अमित जाधव, पल्लवी शेळके, जयंतिका पवार, परमेश्वर पालवे, सुप्रिया फगसे, राशी गिल, सानिका कुंभारदरे, मयुरी गाडे, श्वेता सांडभोर यांनी औषधे भेट दिली. प्रा. मुकेश मोहिते, प्रा.आशिष चिंबाळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कॅन्सर रुग्णांसाठी मॅमोग्राफी मशीन भेट
पिंपरी, ता.२ ः अल्पदरात स्तन कर्करोगाचे निदान होण्यासाठी रोटरी क्लब निगडीच्या वतीने एन्प्रो इंडस्ट्रीजच्या सहकार्याने आळंदी येथील इंद्रायणी रुग्णालय आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटला मॅमोग्राफी मशीन भेट देण्यात आली.
यावेळी अध्यक्ष हरबिंदर सिंग, एन्प्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्णा करकरे, कमलजीत कौर, इंद्रायणी रुग्णालयाचे मुख्य विश्वस्त डॉ. संजय देशमुख, सचिव मुकुंद देशपांडे, निगडी क्लबचे सीएसआर संचालक राकेश सिंघानिया, डॉ. शुभांगी कोठारी, वैद्यकीय संचालक डॉ. अमोल मेहता, राणू सिंघानिया, मुकुंद मुळे, रुग्णालयाचे विश्वस्त अनिल पत्की, वैद्यकीय संचालक डॉ. राजीव जोशी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.