चिंचवड, निगडीतील दोन टोळ्यांना ‘मोका’

चिंचवड, निगडीतील दोन टोळ्यांना ‘मोका’

Published on

पिंपरी, ता. २ : चिंचवड व निगडी येथील दोन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. या वर्षात पोलिसांनी एकूण १८ टोळ्यांमधील ९८ आरोपींवर मोका कारवाई केली आहे.
पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळीप्रमुख अविनाश राकेश पवार (वय २८), संतोष उत्तम चौघुले (वय ३०), ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेंद्र पाटील (वय २७), रंजना उत्तम चौघुले (वय ५२), यश बाबू गरुड (वय १८), निसार मोहम्मद शेख (वय २५), रेणुका मारुती पवार (वय ३६, सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर अकरा गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले.
तसेच निगडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जितेंद्र आनंदा जाधव (वय २३), आकाश उर्फ बबलू दत्ता मोरे (वय १९), अमन समीर शेख व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्यावर सात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
या दोन्ही टोळ्यांतील आरोपींनी पिंपरी, वाकड, चिखली, निगडी, रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगून दहशत माजविणे, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, दुखापत, कट रचणे, तोडफोड, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले. या गुन्हेगारी टोळ्या वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर मोका कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.