शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानप्रबोधिनीचे ४३ विद्यार्थी 
भोसरीतील सिद्धी गेंगजे राज्याच्या गुणवत्ता यादीत द्वितीय

शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानप्रबोधिनीचे ४३ विद्यार्थी भोसरीतील सिद्धी गेंगजे राज्याच्या गुणवत्ता यादीत द्वितीय

Published on

पिंपरी, ता. ४ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील पाचवीचे मराठी व इंग्रजी माध्यमाचे मिळून एकूण २६ तर आठवीचे एकूण १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. भोसरीच्या महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाची सिद्धी जगदीश गेंगजे हिने (९५.९७ टक्के) राज्याच्या गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकवला.
१८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातून या परीक्षेसाठी पाचवीचे ७ हजार ७४० तर आठवीचे ६ हजार ४०६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पाचवीचे २ हजार ९९६ विद्यार्थी (४०.३ टक्के) पात्र ठरले असून, १३२ विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. इयत्ता आठवीचे १ हजार ६३८ विद्यार्थी (२६.६२ टक्के) पात्र ठरले असून, ८४ जण पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. एच.ए. स्कूलची प्रीत प्रसाद पाटील (९२. ५१टक्के) राज्याच्या गुणवत्ता यादीत दहावी आली. महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या प्रणिता प्रदीप पांडे (९१.२७ टक्के) राज्याच्या गुणवत्ता यादीत १३वी, केदार संतोष साळुंके (८९.९३) सतरावा आला तर आदर्श प्राथमिक विद्यालय, भोसरीची मैथिली लक्ष्मण खरात (८९.२६ टक्के) गुण मिळवून राज्याच्या यादीत १९ वी आली. महात्मा फुले शाळेचे २४ तर महापालिकेच्या शाळेतील १५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

आठवीचे ८४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
आठवीचे एक हजार ६३८ विद्यार्थी (२६.६२ टक्के) पात्र ठरले असून, ८४ विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. महात्मा फुले माध्यमिक विद्यालय भोसरीची सर्वज्ञा शशिकांत ताठे (९१.३३ टक्के) राज्यात दहावी, भोसरीचे रामचंद्र गायकवाड विद्यालयातील वरद संतोष पोतदार (८६. ६६ टक्के) चोविसावा आला. महापालिकेच्या पिंपळे सौदागर माध्यमिक विद्यालयाचा प्रणव लोटन शिंदे जिल्हा गुणवत्ता यादीत झळकला आहे. उर्दू प्राथमिक शाळा आकुर्डी येथील तंजिला अब्दुलसुभान काजी (८९.१८ टक्के) सतरावी, उर्दू शाळा रुपीनगर उमर लालसाहब नदाफ (८८. ५१टक्के) तेविसावा, उर्दू प्राथमिक शाळा थेरगाव येथील रुकय्या मुनीर पानसरे (८७.८३ टक्के) २७ वी, उर्दू प्राथमिक शाळा खराळवाडी फुरकन तांबोळी (८५.८१ टक्के) ४९वी, उर्दू प्राथमिक शाळा, चिंचवड स्टेशन मिशकत अशफाक शाह (८५.१३ टक्के) साठावी, महम्मद सिराज चौधरी (८३.७८ टक्के) ८५ वा, उर्दू शाळा जाधववाडी जुवेरिया अब्दुल अहाद (८३.७८ टक्के) ८६वा, उर्दू शाळा रुपीनगर महम्मद युसूफ इसरार इदरीसी (८२. ४३ टक्के) १२१ वा, उर्दू शाळा लांडेवाडी मुजीब नसीम अंसारी (८०.४०टक्के) १८७ वा, उर्दू शाळा रुपीनगर रूबी रिझवान बागवान (७९.०५ टक्के) २२१ वी, मोशी मुले प्राथमिक शाळा प्रणव प्रवीण बोराडे (७७.१८ टक्के) २७५ वा, उर्दू प्राथमिक शाळा, दापोडी अखतारी खातून महम्मद कलीम (७७.०९) २८३ वी, उर्दू प्राथमिक शाळा नेहरू नगर आसिया रहिमतुल्ला पठाण (७७. ०२ टक्के) २८४ वी, उर्दू प्राथमिक शाळा चिंचवड स्टेशन रेयान महम्मद शमीम कुरेशी (७६.३५ टक्के) ३१० वा तर दिघी कन्या शाळेची सृष्टी विक्टर केरकट्टा (७३.८२टक्के) गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ४२५वी आली.

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेत निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाने घवघवीत यश मिळवले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचे हे फळ आहे. हा शिष्यवृत्ती परीक्षेचा उच्चांक आहे. यात आमच्या सर्व यशस्वी मुलामुलींचे त्यांच्या मार्गदर्शकांचे, पालकांचे आणि स्वाती वर्धा यांचे खूप अभिनंदन आहे.
-शिवराज पिंपुडे, शिक्षण विभाग प्रमुख ज्ञानप्रबोधिनी विद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.