मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात 
‘बकुळगंध’चा समावेश

मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात ‘बकुळगंध’चा समावेश

Published on

पिंपरी, ता. ५ ः वे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला वर्गातील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात लेखक कवी राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’चा समावेश करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने या ग्रंथास संदर्भग्रंथ म्हणून मान्यता दिली आहे. शांता शेळके यांच्या साहित्याशी निगडित असलेले तसेच, महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील शंभर मान्यवरांनी त्यांच्या साहित्यावर केलेले भाष्य, मानवंदना म्हणून शांता शेळके यांना अर्पण केलेल्या त्यांच्याच कविता असा एकूण शंभर मान्यवर, शंभर साहित्यभाष्य, शंभर आठवणी, शंभर कवितांचा साहित्यसेवा असलेल्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची निवड मराठी अभ्यास मंडळाने केली आहे. हा ग्रंथ शांता शेळके यांच्या साहित्यावर पी. एचडी. करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.