‘सकाळ एनआयई’ अंकाचे जल्लोषात स्वागत 
शाळानिहाय वितरण ः विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पसरला आनंद

‘सकाळ एनआयई’ अंकाचे जल्लोषात स्वागत शाळानिहाय वितरण ः विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पसरला आनंद

पिंपरी, ता. ५ : उत्साह...आनंद... जल्लोष...उत्सुकता व टाळ्यांचा कडकडाट, यामुळे काही वेळ वातावरण जल्लोषमय झाले होते. निमित्त होते सकाळ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ प्रथम अंकाचे प्रकाशन व वितरण कार्यक्रमाचे. नवा वर्ग, नवे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भेटीला आलेला रंगीबेरंगी ‘सकाळ एनआयई’ अंक हाताळताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.
गमतीशीर कथा, बुद्धीला चालना देणारी शब्दकोडे तर; मुक्तपीठमधील सदरे वाचताना विद्यार्थी मग्न झाले होते. विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव देणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या अंकाचे वितरण शुक्रवारी (ता. ५) समर्थ शिक्षण मंडळ संचालित मनोरम प्राथमिक विद्यालय व समर्थ माध्यमिक विद्यालय, केशवनगर चिंचवड आणि महापालिका हुतात्मा चापेकर विद्या मंदिर चिंचवडगाव येथे पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजय थोरात व प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ केतकर, सचिव स्वरा केतकर, मनोरम प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनाली दळवी, समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रियांका एरंडे, सकाळ पिंपरी कार्यालयाचे सहयोगी संपादक जयंत जाधव, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक आदिनाथ कुचकर उपस्थित होते.
मनपा हुतात्मा चापेकर विद्या मंदिर चिंचवडगाव मुले व मुली विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका वंदना भोसले, उपशिक्षक प्रमोद आर्वीकर, तुषार परबत व शिक्षकवर्ग व पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना एनआयई अंकाचे वितरण करण्यात आले. अंकात विद्यार्थी उपयोगी विविध वाचनीय सदरे असून, अंकासोबत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्राजक्ता भानारकर, मनिषा नेलेकर यांनी प्रास्ताविक केले. श्‍लोक डिंगणकर, शंभू महाजन, यश वैद्य, प्रतिभा गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘सकाळ एनआयई’चे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी प्रास्ताविक व संयोजन केले.


विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याला वाव देणारा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारा हा अंक असून वाचन संस्कृती टिकविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. शालेय वयात वाचनाची आवड निर्माण झाल्यास भविष्यात त्याचा अधिक फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीसुद्धा वाचनाची आवड जोपासली पाहिजे. स्पर्धा परीक्षामध्ये अवांतर वाचन उपयोगी पडते. त्यामुळे ‘सकाळ एनआयई’ हे विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त माध्यम आहे. महापालिका शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात असल्याचा आनंद आहे.
- विजय थोरात, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे. ‘सकाळ एनआयई’ अंकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याला वाव मिळणार असून, या अंकात विविध वाचनीय सदरे आहेत. आनंददायी शिक्षणासाठी असे उपक्रम उपयुक्त असून, ‘सकाळ एनआयई’च्या वाचन चळवळीत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. ज्ञानात भर टाकणाऱ्या या अंकाचा विद्यार्थ्यांना नक्की उपयोग होणार आहे.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
फोटोः 30551, 30550, 30501, 30500

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com