प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त जनजागृती

प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त जनजागृती

Published on

पिंपरी, ता. ९ ः पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी, आकुर्डी भागात आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त फळ आणि भाजी विक्रेत्यांमध्ये जनजागृती करत सामाजिक कार्यकर्ते के. के. कांबळे यांनी कापडी पिशव्यांचे वाटप केले. पालिकेच्यावतीने प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, फळ आणि भाजी विक्रेते हे पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याने नाल्यांमध्ये त्या अडकण्याचे प्रमाण वाढत आहे. निसर्गाचा समतोल राखायचा असल्यास प्लॅस्टिक निर्मूलन आवश्यक आहे. यासाठी जनजागृती केली जात असली तरी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.