विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे 
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा उपक्रम

विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा उपक्रम

Published on

पिंपरी, ता. ७ : आजचा विद्यार्थी हा उद्याचा जबाबदार नागरिक बनावा, यासाठी वाहतुकीचे नियम, सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा वापर, व्यसनाधीनतेपासून दूर राहणे, महिला व मुलींचा सन्मान करणे आदींबाबत शिक्षण देण्याचा शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. ही बाब लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेच्यावतीने ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शहरातील २६८ शाळेतील ६५ हजार ४५६ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात विविध भागातून अनेक मुले शिक्षणासाठी आली आहेत. त्यांना विविध गोष्टींची माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात आठवीच्या पुढील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ७ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक महिन्याच्या गुरुवारी हा उपक्रम राबविण्यात येत असून, अद्यापपर्यंत शहरातील २६८ शाळा सहभागी झाल्या. यामध्ये ६५ हजार ४५६ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस अधिकारी, अंमलदार शाळेमध्ये पोहोचून पीपीटीद्वारे मार्गदर्शन करतात. वाहतूक नियम, सायबर गुन्हेगारी आदींबाबतची माहिती देण्यासह त्यामुळे होणारे परिणामही सांगितले जातात.
दरम्यान, उन्हाळी सुट्यांमुळे हा उपक्रम काही दिवस स्थगित करण्यात आला होता. आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
---------------------
उपक्रमास सुरवात ः ७ डिसेंबर २०२३ पासून
सहभागी शाळा ः २६८
विद्यार्थी उपस्थित संख्या ः ६५४५६
----------------------------

आजचा विद्यार्थी भविष्यात जबाबदार व चांगला नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे ज्ञान असण्यासह इतरही गोष्टींचे ज्ञान देणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील शाळेत ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविला जात असून, विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.
- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड.
----------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.