

पिंपरी, ता. ३० ः ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशी ठाम भूमिका घेऊन पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांनी सांस्कृतिक कार्य केल्याने त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा गौरव करणे हे आपले परम कर्तव्य आहे,’’ असे प्रतिपादन रमेश पतंगे यांनी केले.
चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप सत्रात ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अविनाश कुंभार, अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांची व्यासपीठावर तसेच मांडे कुटुंबीयांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
रमेश पतंगे म्हणाले, ‘‘डॉ. प्रभाकर मांडे यांचे ग्रंथ विचारांना आणि जीवनाला दिशा देणारे होते. सकल हिंदू समाज हा सर्व गुणदोषांसकट आपला आहे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. डॉ. मांडे यांच्या साहित्यातून गावकुसाबाहेरील समाजाचे दर्शन घडते. त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा आढावा घेताना महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण होते. त्यामुळे लोकसंस्कृतीच्या संशोधकांनी निर्भय होऊन मांडे यांच्यासारखी सरस्वती साधना केली पाहिजे.’’
या चर्चासत्राच्या संयोजनात डॉ. अशोक नगरकर, रवींद्र नामदे, नितीन बारणे, सुहास पोफळे, पूनम गुजर, अतुल आडे, समर्थ डोंगरे यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.