

चिंचवडगाव ते बिजलीनगर रस्त्यावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महापारेषण यांची २२००० ते २४००० होल्टची पॉवर केबल भूमिगत टाकण्यात आली आहे. पण, पुढे पदपथावर गुंडाळून ठेवली आहे व पदपथावरील सिमेंट कॉंक्रिटचा दगड चेंबरखाली टाकल्यामुळे पदपथ हा रहदारीचा असल्यामुळे तिथे चालणे धोक्याचे झाले आहे. तेव्हा खड्ड्यात पडायच्या अगोदर महापारेषण कंपनीकडून याची दखल घेऊन केबलचे काम लवकर करून पदपथ मोकळा करावे. जेणेकरून ज्येष्ठ नागरिक, पादचाऱ्यांचा धोका टळेल.
- इंद्रजित चव्हाण, चिंचवड
वाहतूक नियंत्रण दिव्यांचा खांब पदपथावरून हटवावा
वाहतूक नियंत्रण दिव्यांचा खांब हा जुनी सांगवी येथील महाराष्ट्र बॅंकेच्या वळणावरील पदपथावर आणून ठेवला आहे. पायी चालणाऱ्यांना अडथळा होईल याची काळजी करण्यात आली नाही. हा खांब वाहतूक नियंत्रण शाखेने ठेवला आहे की महानगरपालिकेने याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ज्यांनी वाहतूक नियंत्रण दिव्यांचा खांब टाकला असेल त्या विभागाने हा खांब येथून हलवावा.
- प्रदीप गायकवाड, जुनी सांगवी
धनेश्वर पुलाजवळ कचरा डेपो उकिरड्याचे आगार
चिंचवड धनेश्वर पुलाजवळ दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. पालिका सेवकही कचरा उचलतात आणि त्यांच्या दुप्पट कचरा नागरिक टाकतात. खड्ड्यातील कचरा काढता येत नाही. तो कुजतो, सडतो आणि नदीच्या पात्रात मिसळतो. हिवताप, थंडी, चिकनगुनियाने हजारो नागरिक हवालदिल झाले आहेत. येथे १५ फुटी पत्र्यांनी जागा बंदिस्त करावी, जेणेकरून कचरा पलीकडे टाकताच येणार नाही
- रमेश पाटील, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.