ह्रदयदिनानिमित्त जनजागृती

ह्रदयदिनानिमित्त
जनजागृती
Published on

पिंपरी, ता. ३० ः जागतिक हृदयदिन निमित्ताने भोसरीतील मेडिकव्हर हॉस्पिटलच्यावतीने हृदय आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. सूरज पाटील आणि डॉ. संजय कुमार यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी आहार, व्यायाम, ताणतणाव नियंत्रण आणि धूम्रपान व अल्कोहोलपासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून दिले.
याशिवाय, रुग्णालयाच्यावतीने मोफत ईसीजी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पमध्ये १०० पेक्षा अधिक लोकांची निःशुल्क तपासणी करण्यात आली. हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉ. व्यास मौर्य उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना सीपीआर व हृदय आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com