श्री शिवाजी उदय मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात

श्री शिवाजी उदय मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात
Published on

पिंपरी, ता.३० ः चिंचवड येथील श्री शिवाजी उदय मंडळाचा ५२ वा वर्धापन दिन संस्थेच्या क्रीडांगणावर मोठ्या दिमाखात तसेच अतिशय उत्साहात झाला. त्यानिमित्त स्नेहमेळावा, नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा शिबिरेही भरविण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष सदाशिव गोडसे हे कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे उपाध्यक्ष प्रसाद टोणपेकर, रुपेश दळवी, कार्याध्यक्ष राजाराम गावडे, सचिव राहुल कापसे, सहखजिनदार कुंदा हेगडे, सहसचिव जितेंद्र कालेकर, संतोष सुपेकर, विजय राजेशिर्के, सदस्य ज्ञानेश्वर फंगसे, मधुकर शिरोळे, शकूर सय्यद आदी यावेळी उपस्थित होते. मंडळातील कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, स्केटिंग, जिम्नॅस्टिक, मल्लखांब व्यायामपटू, बाल गट विभागातील खेळाडू, ढोल-ताशा पथक विभागातील खेळाडू, इतर सभासद, मंडळाचे जुने सदस्य आणि हितचिंतक स्नेहमेळावा भरविण्यात आला. तसेच यावेळी आयोजित नेत्र चिकित्सा व दंतचिकित्सा शिबिराचा अनेक लोकांनी लाभ घेतला.

विविध मान्यवरांकडून शुभेच्छा
माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक तुषार कामठे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी महापौर अपर्णा डोके, सामाजिक कार्यकर्ते सागर चिंचवडे, माजी नगरसेवक नाना काटे, सामाजिक कार्यकर्त्या सुलक्षणा शीलवंत, ‘भारत केसरी’ विजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावडे आदींनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या सर्व मान्यवरांच्या हस्ते मंडळाच्या वाद्य पथकाच्या सर्व सदस्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
मंडळाचे क्रीडा प्रमुख राकेश दळवी, शुभम भालके, प्रथमेश टोणपेकर, अथर्व डफळ, सुमीत पाटील, श्रेयस टोणपेकर, ओंकार कोल्हापुरे, आशिष शहा, सुनील थोरात, अमित भोंडवे, मयूर पवार, आदित्य ओव्हाळ, मयूर भालके, शुभम गावडे, मनोज देसरडा, भोगेश हतगुंडी अशा अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांसाठी परिश्रम घेतले. संतोष सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. राहुल कापसे यांनी आभार मानले.
PNE24U50512

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com