इटली आयर्नमॅनमध्ये ‘पॉवर पीक्स’चे ऐतिहासिक यश

इटली आयर्नमॅनमध्ये ‘पॉवर पीक्स’चे ऐतिहासिक यश
Published on

पिंपरी, ता. ३० ः इटली येथील आयर्नमॅन स्पर्धेमध्ये ‘पॉवर पीक्स’च्या पथकाने ऐतिहासिक यश मिळविले. पिंपरी-चिंचवडचे प्रसाद पाटील, स्वप्नील चिंचवडे आणि गौतम जुग्गल यांच्यासह एकूण १४ ॲथलिटसनी निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण केली. तर पुण्यातील डॉक्टर कुटुंबासहीत एकूण ७ जणांनी हाफ आयर्नमॅन (७०.३)स्पर्धेत उत्तम कामगिरी नोंदविली.
क्रीडा क्षेत्रातमध्ये आयर्नमॅन स्पर्धा सर्वात खडतर म्हणून ओळखली जाते. इटलीतील एमिलिया-रोमॅग्ना येथे वरील स्पर्धा झाली. त्यामध्ये धावणे, सायकलिंग आणि जलतरण अशा प्रकारांमधून सहभागी होत ॲथलिटस समोर निर्धारित वेळेत म्हणजे १६ तासांत ही स्पर्धा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर हाफ आयर्नमॅन स्पर्धेसाठी आठ तासांची वेळ निश्चित करण्यात आली होती. यजमान इटलीतील खेळाडूंचे कडवे आव्हान, समुद्रातील प्रचंड प्रवाह आणि सायकलिंग करतेवेळी तीव्र चढाई तसेच वाऱ्याला तोंड देत ‘पॉवर पीक्स’च्या खेळाडूंनी हा इतिहास घडविला. प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन खेळाडूंसाठी अतिशय मोलाचे ठरले.
आयर्नमॅन (पूर्ण) स्पर्धेत प्रसाद पाटील (१३.४९.०३), स्वप्नील चिंचवडे (१३.५८.११), गौतम जुग्गल (१४.५६.४०), झामरान हुसेन (१२.२९.३१), ब्रतीन दत्ता (१२.४६.२९), गुरुप्रसाद भट (१४.१५.४८), सागर गुजराथी (१४.२०.३०), अमोल डुंबरे (१५.१३.१३), सुमन कुमार (१५.१७.०५), विश्वास मोटे (१५.२५.०४), अभिजीत वाघचौरे (१५.३६.५८), मनीष सुळे (१५.३८.१५), समीर हाश्मी (१३.५७.४०) आणि जय ओझा (१५.४१.१४) यांनी यश मिळविले.

‘हाफ आयर्नमॅन’चे यशस्वी खेळाडू
आँचल ठाकूर (७.१४.१५), नरसिंह नागराजन (७.२७.११), अश्विन गुप्ता (७.३१.३७), वैशाली डुंबरे-पाटील (७.१८.१५), संपत डुंबरे-पाटील (७.४९.३८), प्राची डुंबरे-पाटील (७.५४.४१) आणि प्रसाद डुंबरे-पाटील (७.४६.२३) यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली.

डॉक्टर कुटुंबाची अनोखी कामगिरी
डॉ.संपत डुंबरे-पाटील हे ऑर्थोपेडिक सर्जन असून डॉ.वैशाली या रेडिओलॉजिस्ट आहेत. प्राची ही एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील तर प्रसाद हा एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. आयर्नमॅन स्पर्धेत घवघवीत यश मिळविणारे हे बहुधा एकमेव कुटुंब असावे, असे ‘पॉवर पीक्स’ने म्हटले आहे.

आयर्नमॅन स्पर्धा आमच्या कुटुंबासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ यांच्या प्रत्येक सल्ल्यानुसार काम केले. हार मानण्याची इच्छा मनात डोकावत असतानाच त्यांच्या पाठबळामुळेच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
- डॉ.संपत डुंबरे-पाटील, ॲथलिट, आयर्नमॅन, इटली

PNE24U50548

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com