मारण्याची धमकी; डॉक्टरवर गुन्हा

मारण्याची धमकी; डॉक्टरवर गुन्हा

Published on

पिंपरी : बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून एकाला धक्काबुक्की व शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पिंपरीतील मोरवाडी येथे घडली. याप्रकरणी इरफान शमशुद्दीन चौधरी (रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. सचिन शशिकांत बोधनी (वय ४९, रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे मासुळकर कॉलनी रस्त्यावरील नाना पार्क येथे त्यांच्या भाच्याची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ आलेल्या आरोपीने ‘तुझ्यामुळे ट्रॅफिक जाम झाले आहे’ असे म्हणत बनावट पिस्तूलचा धाक दाखवला. लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देत आरोपी तेथून निघून गेला.

उधार न दिल्याने दुकानात तोडफोड करीत माजवली दहशत
चिंचवड : किराणा उधार न दिल्याच्या कारणावरून एकाने कोयत्याने दुकानात तोडफोड करीत दुकानदार महिलेच्या हातावर कोयता मारला. तसेच धमकी देत शिवीगाळ करीत परिसरात दहशत माजवली. ही घटना बिजलीनगर, चिंचवड येथे शनिवारी (ता. ६) घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सुनील मारुती लोणी (वय २२, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या त्यांच्या दुकानात असताना आरोपी तिथे आला. ‘तू मला उधार का देत नाहीस’ असे म्हणून त्याने कोयत्याने दुकानातील अंड्यांची बरणी फोडली. कोयत्याने फिर्यादीच्या हातावर मारून जखमी केले. त्यानंतर कोयता हवेत फिरवून ‘दुकान, घर बंद करून इथून निघून जायचं. मी इथला भाई आहे’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीला ‘माझी माहिती पोलिसांना देतो काय, तक्रार केली तर तुला कापून टाकीन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली.

सुरक्षारक्षकानेच पळवले कामगारांचे वीस मोबाईल
भोसरी : कंपनीत मोबाईल वापरण्यास बंदी असल्याने कामगारांनी त्यांचे मोबाईल सुरक्षारक्षकच्या केबिनमध्ये जमा केले. त्यानंतर ते मोबाईल घेऊन तेथील सुरक्षारक्षकच पसार झाल्याची घटना भोसरी एमआयडीसीतील पई ब्रदर्स इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली. गुलशन कुमार (रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र दिनकर काकडे (रा. गोडाऊन चौक, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये कामगारांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी असल्याने सर्व कामगारांनी त्यांचे मोबाईल सिक्युरिटी केबिनमध्ये जमा केले. दरम्यान, तिथे नेमणुकीस असलेला आरोपी सुरक्षारक्षक गुलशन कुमार हा कर्मचाऱ्यांचे एक लाख २० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल घेऊन पसार झाला.

बनावट सोने गहाण ठेऊन घेतले कर्ज; बँकेच्या कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये बनावट सोने तारण ठेऊन दहा लाख ४२ हजार रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केली. याप्रकरणी बँकेच्या सोने तपासणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बँकेच्या काळेवाडी शाखेत घडला. सचिन काकासाहेब पिंपरकर (वय ४५, रा. तापकीरनगर, काळेवाडी), अनुसया गोविंद भदाडे (वय ३२, रा. थेरगाव), संजय बाळू नेळगे (वय ४५, रा. ज्योतिबा कॉलनी, रहाटणी), दिलीप महादेव धारिया (वय ६९, रा. श्रीनगर, रहाटणी), मंदा दत्तात्रेय थोरात (वय ४०, रा. एकटा कॉलनी, थेरगाव), सुनीता दिलीप रकसाळे (वय ४४, रा. संदीपनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मनीषा साळवी यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन पिंपरकर हा बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या काळेवाडी शाखेमध्ये सोने तपासणीस म्हणून काम करतो. त्याने इतर आरोपींशी संगनमत करून त्यांच्याकडून ३५.०३ तोळे वजनाचे बनावट सोन्याचे दागिने घेऊन ते खरे सोन्याचे दागिने असल्याचे फिर्यादीला भासवले. ते बनावट दागिने बँकेत गहाण ठेवून घेतले. त्याबदल्यात आरोपींना १० लाख ४२ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.