पवन मावळात पावसाची संततधार

पवन मावळात पावसाची संततधार

Published on

सोमाटणे, ता. ८ ः पवन मावळात पावसाची तिसऱ्या दिवशीही संततधार सुरूच आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांत उत्साह वाढला असून महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने चालू आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी मावळात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला असून संततधार पाऊस पडत आहे.
आज दिवसभरात पवन मावळाच्या पूर्व भागात वीस मिलिमीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत एकूण २४७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने भातखाचरे तुडुंब भरली आहेत. शेतातून पाणी वाहू लागल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पाऊस भात, नाचणी लावणीसाठी उपयुक्त ठरत आहे.
पावसाने कासारसाईचे जोड धरण पुसाणे हे पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातील पाणी कासारसाई धरणात वाहू लागले आहे. आजच्या पावसाने द्रुतगती व पुणे-मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठले. त्यामुळे, वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. दोन्ही मार्गांवरील वाहतूक दिवसभर सुरळीत परंतु धिम्या गतीने सुरू आहे.
PNE24U31031

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.