रिक्षा चालकाला बेदम मारहाण

रिक्षा चालकाला 
बेदम मारहाण
Published on

पिंपरी, ता. ३० : रिक्षात बसलेल्या चौघांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना चाकणजवळील खराबवाडी येथे घडली.
खंडू सुरेश गायकवाड (रा. नाणेकरवाडी, चाकण) असे या घटनेत जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार सचिन टेकाळे, धीरज ढाले, वैभव चव्हाण, रामदास यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे आरोपींना घेऊन रिक्षातून जात असताना रामदास याने फिर्यादी यांचा शर्ट ओढून मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाण होत असल्याने फिर्यादी रिक्षा थांबवून खाली उतरले. त्यानंतर आरोपीदेखील खाली उतरले. धीरज याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. इतर आरोपींनी हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून आरोपी तिथून निघून गेले.

---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com