आढले (खुर्द) येथे वृक्षलागवड अन्
जोपासण्याची आणि संवर्धनाची शपथ

आढले (खुर्द) येथे वृक्षलागवड अन् जोपासण्याची आणि संवर्धनाची शपथ

Published on

सोमाटणे, ता. ९ ः आढले (खुर्द) येथे मोतीलाल शर्मा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खंडोबा डोंगरावर वृक्ष लावून ती जोपासण्याची व त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. प्रचंड पाऊस पडूनही आढले येथील खंडोबा डोंगराचा भाग हा खडकाळ व तीव्र उताराचा असल्याने या डोंगरावर वृक्ष दुर्मिळ झाले होते, हे लक्षात येताच आढले येथील मोतीलाल शर्मा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, ध्यास केअर फाउंडेशनच्या डॉ. विद्या संतोष पोतले यांच्या मदतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लावून ते जोपासण्याचा निर्धार केला.

या उपक्रमाची सुरुवात खंडोबा डोंगरावर वृक्ष लावून करण्यात आली. सोमवारी (ता. ८) विद्यार्थ्यांनी डोंगरावरील मोकळ्या जागेत कडुलिंब, आपटा, आवळा, वड, बेल या देशी वृक्षाची लावणी केली. वृक्ष लागवडीनंतर वृक्ष दत्तक योजनेअंतर्गत पुढील तीन वर्ष ती जोपासण्याची जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. या झाडाचे चांगले संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोतले परिवाराकडून बक्षीस योजना जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाला उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.