ताथवडे कोंडी जोड

ताथवडे कोंडी जोड

Published on

दररोजच्या कोंडीला आम्ही पुरते वैतागलो आहोत. घरातून बाहेर पडणे किंवा घरात येण्याचा विषय आल्यास अक्षरशः अंगावर काटा येतो. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दल देखील इथे पोहोचू शकत नाही. एवढी भीषण अवस्था आहे. महापालिकेने रुंदीकरण व वाहतूक नियंत्रक दिवे व्यवस्था करून या समस्येतून आमची सुटका करावी.
- मनोज साळुंखे, रहिवासी, ताथवडे

येथील वाहतूक कोंडीची समस्या व अतिक्रमणाबाबत पूर्वी तक्रारी आल्याने मोठी कारवाई करण्यात आली होती. आमचे पथक वारंवार पाहणी करून कारवाई करते. एवढ्यात आम्हाला या रस्त्यावर पथारी, हातगाडीवरील विक्रेते दिसले नाहीत. आता नव्याने काही पथारी व्यावसायिकांनी तेथे बस्तान मांडले असेल; तर त्याची पाहणी करून तात्काळ आणि सातत्याने कारवाई केली जाईल.
- डॉ. अंकुश जाधव, ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी


मॉल चालकांना स्वतःच्या वाहनतळ करण्याबाबत तंबी दिली आहे. रस्त्यातील अतिक्रमणे काढून रस्ता मोठा करण्यासाठी महापालिका प्रशासनास पत्रव्यवहार केला असून पाठपुरावा सुरू आहे. या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी तैनात असतात वीकेंडला मॉलमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते. त्यांची वाहने अस्ताव्यस्त लागतात. त्यामुळे, कोंडी होते. वाहने बेशिस्तपणे उभी केल्यास आम्ही कारवाई करतो.
- सुनील पिंजण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com