गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास शंभर दिवसात शंभर टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तरुणाची ९६ लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ऑनलाइन माध्यमातून घडला. या प्रकरणी पुनावळे येथील ३१ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पारेख ध्रुव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांना ऑनलाइन ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास शंभर दिवसात शंभर टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर, फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून तरुणाची ९६ लाख ५७ हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली.


मनी लॉन्डरिंगच्या रक्कमेचा बनाव
मोशी : मानवी तस्करीसाठी मनी लॉन्डरिंगची रक्कम खात्यावर आल्याचे खोटे सांगून तरुणाची १२ लाख ७५ हजारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मोशी प्राधिकरण येथील ३४ वर्षीय तरुणाने फिर्याद आहे. त्यानुसार, राजीव गुप्ता, दिनेश कुमार नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी यांनी फिर्यादी यांना मनी लॉन्डरिंगमार्फत पैसे तुमच्या खात्यावर आले आहेत, असे सांगून टेलिग्राम ग्रुप बनवला. त्यानंतर, खोटे सांगून फिर्यादी यांना वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून १२ लाख ७५ हजार ५३९ रुपयांची फसवणूक केली.

महिलेची १८ लाखांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची १८ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी पिंपळे निलख येथील ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. एचडीएफसी बँकेच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँकेच्या अकाउंटला १८ लाख १२ हजार ४३६ रुपये भरायला लावले. या रकमेतून आरोपीने युएसडीटी घेऊन रकमेचा अपहार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.